महिलांंमध्ये कमी होऊ शकतो 'बहिरेपणा'चा धोका, केवळ करा 'हे' काम ...

संतुलित आहारामुळे महिलांमधील बाहिरेपणाचा धोका कमी होऊ शकतो असा दावा अमेरिकन संशोधकांनी केला आहे.

Updated: May 16, 2018, 07:36 AM IST
महिलांंमध्ये कमी होऊ शकतो 'बहिरेपणा'चा धोका, केवळ करा 'हे' काम ...  title=

मुंबई : संतुलित आहारामुळे महिलांमधील बाहिरेपणाचा धोका कमी होऊ शकतो असा दावा अमेरिकन संशोधकांनी केला आहे. बहिरेपणाचे विविध टप्पे आणि आहार यांचा एकमेकांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. द ऑल्टरनेट मेडिटेरेनियन डाइट , डाइटर अप्रोचेज टू स्टॉप हाइपरटेंशन आणि अल्टर्नेटिव हेल्दी इटिंग इंडेक्स 2010 अशा 3 आहारांवर गेली 22 वर्ष अभ्यास सुरू आहे. 

आहार आणि बहिरेपण - 

70,966 महिलांवर प्रयोग करण्यात आला होता. त्यानुसार काही महिलांच्या आहारात ऑलिव्ह  ऑईल, डाळिंब, फळभाज्या, फळं, मासे आणि अल्प प्रमाणात दारूचा समावेश करण्यात आला होता. 

दुसर्‍या गटांतील महिलांच्या आहारात फळं, भाज्या, फॅट कमी असलेले डेअरी पदार्थ, सोडियमचे प्रमाण कमी असलेले पदार्थ यांचा समावेश करण्यात आला होता. 

तिसर्‍या गटातील आहारात दोन्ही गटातील आहारघटकांचा समावेश करण्यात आला होता. जर्नल ऑफ न्युट्रिशियन मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, संतुलित आहाराचा समावेश केलेल्या महिलांमध्ये बहिरेपणाचा धोका कमी होतो. चांगल्या आहाराचा कानाच्या आरोग्यावर परिणाम होतो. 
 
बहिरेपणाची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी मुलांना संबंधित लसी देणं गरजेचं आहे. जगभरात 5% लोकांना योग्यरित्या ऐकू येत नाही. यामध्ये 3.2 कोटी लहान मुलांचा समावेश आहे. तर भारतातील 50 लाख मुलांचा यामध्ये समावेश होतो. 

दोन प्रकारचे बहिरेपण  

जन्मतः कानात दोष असणं किंवा तीव्र झटका, अपघात, ध्वनीप्रदुषण यामुळे येणारं बहिरेपणं अशा दोन स्वरूपात बहिरेपणची समस्या वाढते. कानात इन्फेक्शनमुळेही बहिरेपणाची समस्या वाढू शकते. 

 बहिरेपणाचा त्रास टाळण्यासाठी काय कराल ?  

 कानामध्ये कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्या. कानातील पडद्याचं नुकसान झालं की त्याचा परिणाम ऐकण्याच्या क्षमतेवर होतो. 
 
 लहान मुलांच्या कानात पाणी जाणार नाही याची काळजी घ्या. 
 
 लहान मुलांचे कान साफ करण्यासाठी कोणत्याही टोकधार वस्तूचा वापर करू नका. 
 
 अत्यंत मोठ्या आवाजात वाजणार्‍या संगीतापासून लहान मुलांना दूर ठेवा. त्याचा परिणाम ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो. 
 
 लहान मुलांना वेळोवेळी आवश्यक असणार्‍या सार्‍या लसीकरणांचा कोर्स पूर्ण करा. यामध्ये कानातील इन्फेक्शन टाळण्याची इंजेक्शनदेखील असतात.