पाठीच्या 'या' भागातील दुखणे घेऊ नका हलक्यात, असू शकतं ह्रदयविकाराचं लक्षण

Health Tips : जर तुमची सारखी पाठ दुखत असेल तर या पाठदुखीकडे दुर्लक्ष करु नका. कारण पाठदुखीचा त्रास तुम्हाला ह्रदयविकाराच्या त्रासाकडे घेऊ जावू शकतो. त्यामुळे जाणून घ्या पाठीच्या कोणत्या भागात जास्त दुखणं धोकादाय ठरु शकतं?

श्वेता चव्हाण | Updated: Feb 14, 2024, 03:58 PM IST
पाठीच्या 'या' भागातील दुखणे घेऊ नका हलक्यात, असू शकतं ह्रदयविकाराचं लक्षण title=

Back Pain : ऑफीसमध्ये कामानिमित्त तासन् तास एकाच जागी बसल्यामुळे पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावं लागतं. यामध्ये पुरुष असो किंवा स्त्रियायांचा पाठदुखी ही एक समस्या सामान्य आहे. काहीजणाचा पाठदुखीचा त्रास इतका होतो की त्यांना काही दिवस कामापासून दूर राहावे लागते, अनेक व्यायाम, उपचार करुनही पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही. 8 ते 9 तासांच्या कार्यालयीन कामकाजामुळे पाठदुखीचा त्रास होत असतो. अनेकांना असं वाटतं की, पाठदुखी ही समस्या सामान्य समजून दुर्लक्ष करतात. पण दीर्घकालीन पाठदुखीचा त्रास हा तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. 

पाठदुखीची काय आहेत कारण? 

जास्त वेळ एकाच ठिकाणी बसणे, शरीराची योग्य काळजी न घेणे, वजन जास्त असणे किंवा व्यायाम न करणे यामुळे पाठदुखीचा त्रास, जास्त वेळ उभं राहिल्याने, लोकलने प्रवास करताना पाठदुखीचा त्रास, तसेच जास्त मानसिक ताण आणि थकवा यामुळे ही पाठीचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे पाठदुखीची समस्या होते, अनेकवेळा काहीजण झोपताना पाय दुमडून झोपतात यामुळे ही पाठदुखीची समस्या होते.  

पाठीचा कणा दुखणे

पाठीचा कणा दुखणे हे स्पाइनल स्टेनोसिससह अनेक वैद्यकीय स्थितींचे लक्षण असू शकते. स्पाइनल स्टेनोसिस शरीराच्या खालच्या भागात स्पायनल कॅनाल अरुंद झाल्यावर स्पाइनल स्टेनोसिस होतो. त्यामुळे पाठीचा कणा किंवा पाठीच्या कण्यापासून स्नायूंकडे जाणाऱ्या मज्जातंतूंवर दबाब पडतो, त्यामुळे वेदना होतात. स्पाइनल स्टेनोसिस तुमच्या मणक्यामध्ये कुठेही होऊ शकतो पण मणक्याच्या खालच्या भागात असणं सर्वात सामान्य आहे. 

पाठीच्या दोन्ही बाजूंना दुखणं

पाठीच्या दोन्ही बाजूंना वेदना होत असतील तर  मूत्रपिंड, आतडे किंवा गर्भाशयासारख्या समस्या आहे. मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे तुमच्या मणक्याच्या दोन्ही बाजूंच्या बरगड्यांमध्ये वेदना होऊ शकतात. जर एखाद्याला मूत्रपिंडाची समस्या असल्यास, वेदना सहसा मूत्रपिंडाच्या भागात पसरते. मूत्रपिंड हे बरगड्यांच्या खाली मध्यभागी असते, जर एखाद्याला मूत्रपिंड किंवा मूत्रमार्गाची समस्या असेल तर त्याला मणक्यामध्ये वेदना होतात.   

जर तुमच्या शरीरात पाठदुखीचा त्रास सतत वेदना होत असतील तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. कार्डिय़ाक अरेस्ट हा हृदयविकाराच्या झटक्यानंतर येतो. ह्रदयाचा झटका हा हृदयाच्या मुख्य धमन्यांपैकी एकामध्ये अडथळा निर्माण होणे, ज्यामुळे हृदयाला अचानक नुकसान होते. जेव्हा हृदय काम करणे थांबवते, तेव्हा हृदयामध्ये इलेक्ट्रीकल डिसटरबेंस होऊ शकते, ज्यामुळे हृदयाचा झटका येऊ शकतो. 

तसेच छातीत दुखणे हे देखील हृदयविकाराचे एक सामान्य लक्षण आहे. कार्डियाक अरेस्टमुळे शरीरात कुठेही वेदना होऊ शकतात. तीच वेदना समोर, डावा किंवा उजवा खांदा, डावा हात, उजवा हात, पाठीचा खालचा भाग, जबडा, मान, दोन्ही खांद्याच्या ब्लेडमध्ये किंवा हनुवटीपासून नाभीपर्यंत कुठेही होऊ शकते. एकंदरीत पाठदुखीच्या त्रासाला दुर्लक्षित करण्याची चूक करु नका.