चटका बसल्यानंतर हे ५ घरगुती टाळाच

काम करताना किंवा अपाघातानेही चाटका बसला तर सहाजिकच पाहिला उपचार हा घरगुतीच केला जातो.

Updated: Oct 29, 2017, 07:20 PM IST
चटका बसल्यानंतर हे ५ घरगुती टाळाच  title=

मुंबई : काम करताना किंवा अपाघातानेही चाटका बसला तर सहाजिकच पाहिला उपचार हा घरगुतीच केला जातो.

घरातील किंवा नैसर्गिक उपाय करताना मात्र चूक झाल्यास लहानशी जखमदेखिल गंभीर स्वरूप घेऊ शकते. म्हणूनच हे ५ घरगुती उपाय मूळीच करू नका 

हळद -  एखादी चिर किंवा कट असल्यास रक्तस्त्राव थांबवण्यासाठी हळद मदत करते. मात्र हळदीचा वापर कोणत्याही बर्नवर / चटका बसल्यास करू नका. यामुळे त्रास अधिक वाढण्याचा धोका असतो. 

बर्फ - बर्न/ चटका लागल्यास बर्फ थेट वापरू नका. आधी जखम वाहत्या पाण्याखाली धरावी. नंतर बर्फ लावा. अन्यथा त्वचेतील टिश्युचे नुकसान होते. आईस पॅक वापरणे देखील टाळा. 

माती - लहान मुलं किंवा काही पालकही थंडावा निर्माण होण्यासाठी जळलेया / चटका बसलेल्या भागावर माती लावतात. असे केल्यास मातीतील जंतू त्वचेचे नुकसान करतात. 

तेल - चटका बसल्यानंतर काही वेळाने खाज येते. खाज टाळण्यासाठी तेलाचा वापर करणं टाळा. यामुळे नुकसान होते. इंफेक्शनचा धोका वाढतो. 

टुथपेस्ट - शू बाईट्चा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी कदाचित टूथपेस्ट मदत करू शकते मात्र बर्न / चटक्याच्या वेदना कमी करण्यासाठी टुथपेस्ट वापरू नका