Water Testing : पाणी म्हणजे जीवन...पाण्याशिवाय आपण जगू शकतं नाही. मानवाचा शरीर हेदेखील 70% पाण्याने बनलेलं आहे. पाणी शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरदेखील आपल्याला जास्त जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. दररोज पुरुषांनी किमान तीन लीटर तर महिलांनी किमान 2 लिटर पाणी प्यायला पाहिजे. उन्हाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण हे कमी होतं.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उन्हाळ्यात पाण्यासाठी आजही महिलांना कोसोदूर चालत जावं लागतं. मानवाला शुद्ध पाणी मिळावं म्हणून भारत सरकारानने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केलीय. जलशक्ती मंत्रालयाने नुकताच एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. ज्यात म्हटलंय की, भारतातील 80% लोक ग्राउंडवाटर पाणी पितात. या ग्राउंडवाटरमध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणाऱ्या घटक आढळल्याचं उघड झालंय. (Are you drinking cancerous water Jal Shakti Ministry told how to identify toxic water)
जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भूजलातून पाणीपुरवठा हा देशभरात करण्यात येतो. जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार त्यात निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त विषारी धातू आढळून आले आहेत. सोप्या भाषेत पाणी विषारी असल्याचं समोर आलंय. पाण्यात अनेक घटक असतात ते कमी प्रमाणात असल्यास ते पाणी पिण्या योग्य असतं. पण हीच संख्या खूप जास्त झाल्यास ते पाणी आपल्यासाठी विषारी ठरतं.
जलशक्ती मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील असे अनेक जिल्हे आहेत ज्यांच्या भूजलामध्ये आर्सेनिक आणि लोहाचे प्रमाण निश्चित मानकांपेक्षा खूप जास्त प्रमाणात आढळले आहेत. हे पाणी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याच तज्ज्ञांचं मत आहे. जास्त आर्सेनिक आणि लोह असलेले पाणी प्यायल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. महत्त्वाच म्हणजे कर्करोग होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढते.
हे विषारी पाणी प्यायल्यानंतर पोटदुखी, उलट्या, जुलाब किंवा अशी काही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे तुम्ही पाण्याची सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या पाणी चाचणी प्रयोगशाळेत चाचणीासाठी देऊ शकतात. अशा पाणी तपासणी प्रयोगशाळा सर्व राज्यांमध्ये असून तुम्ही तुमच्या शहरातील आणि घरातील पाणी चाचणीसाठी देऊ शकतात.
तुमच्या घरातील पाणी तपासण्यासाठी तुम्हाला साधारण 500 ते 600 रुपये खर्च येतो. सुमारे 14 पॅरामीटर्सच्या आधारे पाणी तपास केलं जातं. त्यानंतरच हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, हे अहवालातून स्पष्ट होतं.