हे अनोखे फळ पौष्टिकतेचे केंद्र, भारतीय बाजारपेठेत झपाट्याने वाढतेय मागणी

अमरफळमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात, म्हणून याला जीवनसत्त्वांचा खजिना देखील म्हटले जाते.

Updated: Oct 31, 2022, 12:04 AM IST
हे अनोखे फळ पौष्टिकतेचे केंद्र, भारतीय बाजारपेठेत झपाट्याने वाढतेय मागणी title=

Persimmon fruit benefits: आपल्या आरोग्यासाठी फळे किती फायदेशीर आहेत हे कोणाला सांगण्याची गरज नाही. फळे अनेक प्रकारच्या गंभीर आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात आणि फळांच्या सेवनाने शरीरातील ऊर्जा पातळीही कायम राहते. सध्या भारतातील बाजारपेठेत एक चायनीज फळ खूप लोकप्रिय होत आहे. हिंदीत लोक याला अमरफळ या नावाने संबोधतले जाते. तर इंग्रजीत पर्सिमॉन म्हणतात. त्याचे फायदे जाणून घेतल्यास तुम्हीही यापासून फार काळ दूर राहू शकणार नाही.

अमरफळचे फायदे

1. अमरफळमध्ये व्हिटॅमिन C, E, K, B1, B2 आणि व्हिटॅमिन B6, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने दृष्टी सुधारते आणि त्यात असलेले अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे हंगामी संसर्गाचा धोका कमी होतो.

2. अमरफळ नावाप्रमाणेच काम करते. रोज एक फळ आहारात समावेश केल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो कारण त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि क्वेर्सेटिन हृदयाला निरोगी ठेवतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते हे फळ मल्टीविटामिनचा खजिना आहे.

३. शरीरातील वाढत्या चरबीमुळे तुम्ही हैराण असाल तर हे फळ तुम्हाला शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करेल. हे खाल्ल्याने तुमचे पोट भरलेले राहिल, ज्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून स्वत:ला रोखू शकता. त्यात असलेल्या फायबरमुळे तुमची पचनक्रिया हळूहळू ठीक होऊ लागते आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.