मुंबई : केवळ आकर्षणातून निर्माण झालेल्या प्रेमात कधी ना कधी ब्रेकअप हा नक्की. पण, प्रेम म्हटले की त्यात भावनीक गुंतागूंत ही आलीच. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावरही आठवणी पाठ सोडात नाहीत. जाणून घ्या अशा वेळी पार्टनरच्या मनात तुमच्याबाबत काय विचार येतात...
नेहमीचा सहवास ब्रेकअपनंतर संपतो. उरतो तो केवळ एकटेपणा. अशा वेळी एकटेपणाने पार्टनर अधिकच केविलवाणा होतो. त्याच्या मनात सतत विचार येतो. असं काय घडलं की, तो असा वागला. त्यात माझी काय चूक होती.
ब्रेकअप होणं म्हणजे आयुष्यातील सर्वच काही संपण.. गमावणं... नव्हे. पण, त्या वेड्या मनांना हे कसं कळावं? ते आपले एकटेपणाने विचार करत राहतात. आपले जीवनच संपवावे का? पण, अशा वेळी एका रात्रीत जग अंधारात लोटले जात नाही. उद्या पुन्हा नवा सुर्य उगवणार असतोच... हा विचार करून सकारात्मकपणे कामाला लागावे.
अनेकदा ब्रेकअप झाला तरी, पार्टरबाबतचे विचार संपत नाहीत. त्यामुळे अशा वेळी पार्टनरवर पाळत ठेवली जाते. अनेकदा हे प्रत्यक्ष घडते असे नाही. पण, दोघांच्या कॉमन फ्रेण्डसच्या माध्यमातून माहिती घेतली जाते. अनेकदा सोशल मीडियावर बनावट अकाऊंट काढून त्याद्वारे पार्टनरवर पाळत ठेवली जाते.
काही प्रकरणांमध्ये मतभेदांमुळे, मन दुखावल्यामुळे ब्रेकअप होते. अशा वेळी एखादा पार्टनर आपल्या माजी पार्टनरला जळवण्यासाठी दुसऱ्या पार्टनरसोबत फिरतो. अशा वेळी तो एक्स पार्टनर सोबतच्या व्यक्तीला मारहाण करण्यापर्यंत मजल मारू शकतो.
वहुतांश वेळा ब्रेकअप झाल्यावर अनेक लोक व्यसनाच्या अहारी जातात. काहींच्या बाबतीत हा प्रभाव मर्यादीत काळासाठी अनेकांसाठी दीर्घकालीन. पण, ब्रेकअपचं दुख: विसरण्यासाठी व्यसनाच्या अहारी जाणे हा पर्याय नाही.