Best Weight Loss Tips: पोटावरील फॅट लोण्यासारखी वितळेल, वजन कमी करण्याचे उत्तम घरघुती उपाय

आजकालच्या धकाधकीच्या जगात आपल्यापैकी अनेकांना वाढत्या वजनाची समस्या सतावते. वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिममध्ये जातात, डायटिंग करतात.

Updated: Aug 24, 2022, 09:21 PM IST
Best Weight Loss Tips: पोटावरील फॅट लोण्यासारखी वितळेल, वजन कमी करण्याचे उत्तम घरघुती उपाय title=

Best Weight Loss Tips: आजकालच्या धकाधकीच्या जगात आपल्यापैकी अनेकांना वाढत्या वजनाची समस्या सतावते. वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिममध्ये जातात, डायटिंग करतात. मात्र या गोष्टी केवळ ऐकायलाच चांगल्या वाटतात. वजन वाढल्याने अनेक व्याधी जडण्याची शक्यता असते. अशात तुम्ही घरगुती पद्धतीने वजन कमीकरू इच्छिता तर तुम्ही खालील दिलेल्या काही घरगुती उपायांचा वापर करू शकतात. या उपायांनी तुम्ही फिट ठेवू शकतात.  

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय. 

जिऱ्याचं पाणी 

जिऱ्याचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असल्यास तुम्ही तुमच्या आहारात जिरा पाण्याचा वापर करू शकतात. दररोज रिकाम्यापोटी तुम्ही जिऱ्याचं पाणी पिऊ शकतात. जिऱ्यात व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखी पोषक तत्व असतात.
लिंबू आणि मधाचं सेवन 

लिंबू आणि माडाच्या वापर 

वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात लिंबू आणि मधाचा वापर करू शकतात. यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते, सोबतच तुमचं मेटॅबॉलिझम सुधारतं. लिंबू आणि मधाचं सेवन करण्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. दररोज याचं सेवन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. 

आवळा 

वजन कमी करण्यासाठी आवळा फायदेशीर मानला जातो. आवळ्यात विटॅमिन C आढळतं. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. दररोज आवळ्याचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास मेटाबॉलिझम देखील सुधारतं. यामुळे, तुम्ही शरीरातील कॅलरीज जलद गतीने कमी करू शकतात. 

(विशेष नोंद - वरील बातमी सामान्य ज्ञानावर आहारात आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा) 

aamla jeera water and lemon and honey best weight loss homemade remediess