Best Health Tips: तुमच्या आहारात करा 'या' राईसचा समावेश, कॅन्सरपासून राहाल लांब

भारतात आपण सर्वजण प्रामुख्याने सफेद भात खातो. अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. 

Updated: Aug 24, 2022, 05:52 PM IST
Best Health Tips: तुमच्या आहारात करा 'या' राईसचा समावेश, कॅन्सरपासून राहाल लांब title=

Bebifits of replacng white rice with brown rice : भारतात आपण सर्वजण प्रामुख्याने सफेद भात खातो. अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. जुन्या काळात याचा ज्यूसही प्यायला जायचा. यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होणं, शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होणं, यासारखे फायदे होतात. 

मात्र डायटिशियन आता सफेद भात खाण्याऐवजी ब्राऊन राईस खाण्याचा सल्ला देतात. ब्राऊन राईस खाल्ल्याने  शरीरातील गंभीर आजारांची लक्षणं कमी होतात. ब्राऊन राईस खाल्ल्याने कॅन्सरची लक्षणं, वेगाने होणारी वजनवाढ, सकाळी झोपून उठल्यावर होणारी अंगदुखी यावर नियंत्रण मिळण्यास मदत होते. सफेद तांदूळ हा पॉलिश केलेला असतो. त्यामुळे, त्यातील पोषक तत्व निघून जातात. जाणून घेऊयात ब्राऊन राईस खाण्याच्या फायद्यांबाबत. 

कॅन्सरपासून बचाव 

कॅन्सरवर ठोस उपाय अजूनही उपलब्ध नाही. कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर विविध उपाय सांगतात ज्याच्या वापराने आपण कॅन्सरला दूर ठेवू शकतो. कॅन्सरचे विविध प्रकार असतात. ब्रेस्ट कँसर, ब्लड कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर इत्यादी... मात्र तुमचा आहार चांगला असेल तर तुम्ही कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करू शकतात. यासाठी ब्राऊन राईस जर आहारात ठेवला तर तुम्ही कॅन्सरपासून स्वतःला दूर ठेवू शकतात. 

हृदयासाठी आहे फायदेशीर 

तुमचं हृदय सुधृढ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी, सफेद भाताशिवाय तुम्ही ब्राऊन राईस खाल्यास हार्ट अटॅक, कार्डियॅक अरेस्ट अशा गंभीर आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकतात. वजन जास्त असल्यास डॉक्टर ब्राऊन राईस खाण्याचा सल्ला देतात. 

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास होते मदत

तुम्ही दररोज ब्राऊन राईस खात असाल तर कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. रिकाम्यापोटी तुम्ही ब्राऊन राईस खाल्यास पोटातील विषारी पदार्थ मलावाटे शरीराबाहेर पडण्यास मदत होते. ब्राऊन राईसने गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. शरीरातील रक्त साफ होण्यास मदत होते. म्हणून डायटिशियन ब्राऊन राईस खाण्याचा सल्ला देतात.   

मधुमेहावर मिळवा नियंत्रण

मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वाढतंय. मधुमेहापासून बचाव करण्यासाठी सफेद भात खाण्याऐवजी ब्राऊन राईस खाण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणात बदल करणं गरजेचं आहे. तुम्ही जेवणात ब्राऊन राईसचा वापर करण्यास तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये येऊ शकतो. याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. सोबतच ब्राऊन राईस पचनासाठी अतिशय हलका असतो. 

brown rice and its amazing benefits works on cancer as well