मुंबई : आधुनिक संस्कृतीत संतुलित आहार घेण्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. परंतु आयुर्वेदाचे नियमांना अधिक मानलं जात नाही. मात्र जर तुम्हाला तुमचे आरोग्य जपायचं असेल तर तुमच्या आहाराचं व्यवस्थापन करण्यासाठी आयुर्वेदाची तत्त्वं समजून घ्या. आयुर्वेदानुसार, आहारात काही गोष्टींचा मेळ घातकही ठरू शकतो.
जर तुम्ही उडदाची डाळ खाल्ली असेल तर त्यानंतर कधीही दूध पिऊ नका. याशिवाय मुळा, अंडी, मांस खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. यानंतर, दूध प्यायल्याने पचनसंस्थेचं कार्य बिघडते.
अनेकांना जेवणात सॅलड म्हणून मुळा खाण्यास आवडतो. पण जर तुम्ही भेंडीचं सेवन करत असाल तर मुळा कधीही एकत्र खाऊ नका. मुळा आणि भेंडी यांच्या एकत्र सेवनामुळे त्वचेमध्ये काही बदल दिसून येतात. ज्यामुळे चेहऱ्यावर डागांसारख्या त्वचेशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात.
अनेकदा दुधात फळं घालून शेक बनवला जातो. कस्टर्डमध्ये सुद्धा दुधात फळांचा समावेश केला जातो. पण फळे दुधाबरोबर खाऊ नयेत. दुधात मिसळलेली फळे खाल्ल्याने दुधात असलेले कॅल्शियम फळांचे एंजाइम शोषून घेतं. यामुळे शरीराला फळांचा कोणताही लाभ मिळत नाही.
उन्हाळ्याच्या हंगामात भिंडी आणि करडईही बाजारात उपलब्ध असते. काही लोकांना दोन्ही भाज्या आवडतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, भेंडी आणि करडई कधीही एकत्र खाऊ नये. भेंडी आणि करडईचे सेवन पोटात विष तयार करण्याचं काम करते. यामुळे तुमच्यासाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कांद्याचं आणि दही यांचं मिश्रण कधीही चांगलं मानलं जात नाही. ते खाणं टाळावं अन्यथा खाज सुटणं, एक्जिमा तसंच सोरायसिससारखे त्वचा रोग आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
येथे दिलेली माहिती कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याने नाही.