Cough Syrup | सावधान! मुलांना कफ सिरप देताय?

लहान मुलांना सर्दी-खोकला झाला तर आपण सर्रासपणे कफ सिरप देतो. डॉक्टरही लहान मुलांना कफ सिरप पाजण्याचा सल्ला देतात.  

Updated: Oct 6, 2022, 11:47 PM IST
Cough Syrup | सावधान! मुलांना कफ सिरप देताय?   title=

मुंबई : सर्दी-खोकला झाल्यानंतर आपण लहान मुलांना कफ सिरप (cough syrup) देतो. पण हेच कफ सिरप चिमुकल्यांच्या जिवावर उठलंय. गाम्बियात (gambia) कफ सिरपने 66 मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे WHOनं कफ सिरप बनवणा-या भारतीय कंपनीबाबत अलर्ट जारी केलाय. पाहूयात हा रिपोर्ट. (66 children die in gambia world health organization to investigate indian cough syrup) 
 
लहान मुलांना सर्दी-खोकला झाला तर आपण सर्रासपणे कफ सिरप देतो. डॉक्टरही लहान मुलांना कफ सिरप पाजण्याचा सल्ला देतात. मात्र गांबियात याच कफ सिरपनं 66 चिमुकल्यांचा बळी घेतलाय. त्यानंतर WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं कफ सिरप बनवणा-या भारतीय कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. गांबियात मरण पावलेल्या मुलांची किडनी निकामी झाल्याचं आढळून आलंय. त्यामुळेच WHOनं या कफ सिरप कंपनीची चारही उत्पादनं सुरक्षित नसल्याचा इशारा दिलाय. 

WHOनं हरियाणातल्या मेडेन फार्मास्यूटिकल कंपनीच्या उत्पादनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या कंपनीची प्रोमिथेजीन ओरल सोल्यूशन, कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप, मेकऑफ बेबी कफ सिरप आणि मॅगरिप एन कोल्ड सिरप ही चार औषधं अतिशय घातक असल्याचा इशारा WHOनं दिलाय. या कंपनीमार्फत बनवण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये इथिलेन ग्लायकोल, डायथेलेन ग्लायकोलचा वापर करण्यात आलाय. 

WHOच्या इशा-यानंतर भारतीय आरोग्ययंत्रणा सतर्क झालीय. हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ या औषधांच्या तपासणीचे आदेश दिले असून कडक कारवाईचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे WHO नं याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडे दिलेली नसल्याचं सूत्रांचं म्हणणंय. मात्र WHOच्या इशा-यानं देशात खळबळ माजलीय. या बातमीनं सगळ्या पालकवर्गाची चिंता वाढलीय. त्यामुळे आपल्या मुलांना कफ सिरप देण्यापूर्वी विचार करा, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यांना औषधं द्या.