Relationship Tips: नात्यात वाढलेला दुरावा कमी करायचाय? या 5 खूप महत्त्वाच्या टिप्स

जर तुमच्या नात्यात दूरावा येत असेल तर त्याची कारणे काय असू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..

Updated: Sep 26, 2022, 08:02 PM IST
Relationship Tips: नात्यात वाढलेला दुरावा कमी करायचाय? या 5 खूप महत्त्वाच्या टिप्स title=
5 signs a relationship can be repaired NZ

Relationship Tips: एखादं नातं फुलायला बराच वेळ लागतो, पण नातं तुटायला एक क्षण पुरेसा होतो. लहान सहान गोष्टींमुळे नात्यात दुरावा येतो. अनेकदा नात्यात येणाऱ्या दुराव्यासाठी त्या दोन्ही व्यक्ती जवाबदार असतात, हे नाकारता येणार नाही. या जगात प्रत्येक माणसात काहीनाकाही गुण आणि दोष असतातच. तुम्ही त्या व्यकतीत काय शोधता किंवा त्या व्यक्तीचा कसा विचार करता हे महत्त्वाचे असते. जर तुमच्या नात्यात दूरावा येत असेल तर त्याची कारणे काय असू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.. (5 signs a relationship can be repaired NZ)

का रे दुरावा, का रे अबोला

अपराध माझा असा काय झाला?

1. चुका मान्य करा (Admit mistakes)
चुका माणसांकडूनच होतात हे लहानपणापासूनच आपल्याला सांगितलं जातं. तुम्ही वाद न घालता चुक मान्य केली तर समोरची व्यक्ती जास्त वेळ तुमच्यावर राग धरुन राहत नाही. तुमच्यात चुक मान्य करण्याची क्षमता असली पाहिजे. तुमच्या चुकांचे तुमच्याजवळ गणित असले पाहिजे. ती चूक पुन्हा होणार नाही याची जवाबदारी तुम्हाला घेतली पाहिजे आणि समोरच्याला ही त्याची खात्री पटवली पाहिजे.

2. नात्याला महत्त्व द्या (Value the relationship)
तुमचे पहिलं प्राधान्य हे तुमच्या नात्याला असावं. तुम्ही दोघांनीही एकमेकांना समान महत्त्व दिलं पाहिजे. नात्याची जवाबदारी ही कुणा एकट्यावर न पडता दोघांनींही घेतली पाहिजे. अशावेळेस नातं जड वाटत नाही. यामुळे नात्याचं महत्त्व टिकून राहतं, यातूनच एकत्र राहण्याची इच्छा समजते.

आणखी वाचा... Relationship tips: तुम्ही डेटला गेल्यावर या चुका करता का? चुका टाळण्याच्या सिक्रेट टिप्स

3. चांगला वेळ एकमेकांसोबत घालवा (Spend quality time with each other)

चांगल्या आठवणी जमा करा, जेणेकरुन चांगलाच वेळ घालवण्याची सवय लागेल. वाईट वेळ घालवणे किंवा वाईट आठवणींना उजाळा देऊन त्यावर भांडत बसणे यात शहाणपणा नाही. यामुळे तुमच्याजवळ भावना व्यक्त करण्यासाठी कमी वेळ राहिल आणि मग शेवटी त्याचा तुम्हाला पश्चाताप होईल.

4. संवाद साधताना अपमान नसावा (nonviolent communication)
तुमच्या संवादाने, तुम्ही वापरणाऱ्या शब्दांनी कोणत्याही प्रकारचं शोषण होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तुमचा संवाद हा समोरच्याला अपमानकारक वाटेल असा नसावा. जर असा संवाद असल्यास तुमचे नाते फार काळ तग धरु शकत नाही.

आणखी वाचा... निरोगी नातेसंबंध कसे असावे? हे सल्ले तुमच्या आयुष्यात नक्कीच फायदेशीर ठरतील

5. कोणालाही बदलण्याचा प्रयत्न करु नका (Don't try to change anyone)

बदल हा परिवर्तनाचा नियमच आहे. पण एखादी व्यक्ती जन्मत: तशीच असल्यास त्या व्यक्तीला पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न ना केलेला बरा. ती व्यक्ती जशी आहे तसंच तिला अक्सेप्ट करणं गरजेचं आहे. अशाने नातं फुलायला चांगलीच संधी मिळते. जर एखाद्या व्यक्तीस व्यसन किंवा वाईट सवयी असल्यास त्या व्यक्तीमध्ये योग्य तो बदल तुम्ही करु शकता.