मुंबई : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही हे काल समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसून आलंय. शुक्रवारी, महाराष्ट्रात कोरोनाचे 311 नवीन रुग्ण आढळले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. या महामारीमुळे राज्यात एकाही व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला नाही.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी एकट्या मुंबईत 231 नवीन कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली आहे. नव्या कोरोना रूग्णांमुळे राज्यातील रुग्णांची संख्या 78,82,169 झाली आहे. दरम्यान मृत्यूची नोंद नसल्याने जीवितहानी न झाल्याने मृतांची संख्या 1,47,856 वर कायम आहे.
विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 270 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 1761 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 77,32,552 रुग्णांनी संसर्गावर मात केली आहे.
मुंबई महानगरातील कोरोनाच्या साथीच्या रुग्णांची संख्या 10,62,476 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 19,566 वर कायम आहे.
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 155 रुग्ण बरे झाल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या 10,41,766 झाली आहे. सध्या 1144 रुग्ण उपचार घेत आहेत.