मुंबई : चिंच बोलताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चिंच चवीला जशी मस्त, चटपटीत लागते तसेच त्याचे सौंदर्यवर्धक फायदे देखील आहेत. चिंचेचा पॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचा सतेज व चमकदार होते. मग जाणून घेऊया चिंचेचे फेसपॅक...
चिंचेतील बी काढून कोमट पाण्यात टाका. १० मिनीटांनी ते पाण्यात नीट मिक्स करा. पाण्याचा रंग बदलेल आणि थोडी घट्टसर पेस्ट बनेल.
दीड चमचा बेसनात चिंचेचे पाणी घालून मिक्स करा आणि त्याची घट्टसर पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून नीट मिक्स करा आणि २० मिनीटांनी चेहरा धुवा. तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हा पॅक उपयुक्त ठरेल.
वरिल फेसपॅकप्रमाणेच हा पॅक देखील बनवा. ब्रेकआऊट्सच्या जागी हा पॅक लावा. थोड्या वेळाने धुवून त्यावार मॉश्चराईजर लावा.
१ चमचा ओट्स वाटून त्याची पावडर बनवा. ती चिंचेच्या पाण्यात मिसळा व त्याची पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.