Omicron Variant | ओमायक्रॉनची 2 सर्वात मोठी लक्षणं, जाणून घ्या स्वत:ला कसं सुरक्षित ठेवायचं

संपूर्ण जगावर कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचं (Omicron Variant) संकट ओढावलंय. या ओमायक्रॉनमुळे सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे.

Updated: Dec 27, 2021, 07:20 PM IST
Omicron Variant | ओमायक्रॉनची 2 सर्वात मोठी लक्षणं, जाणून घ्या स्वत:ला कसं सुरक्षित ठेवायचं title=

मुंबई : संपूर्ण जगावर कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचं संकट ओढावलंय. या ओमायक्रॉनमुळे सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा हा 400 पार गेला आहे. दररोज वाढत्या आकड्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारही सतर्क झालं आहे.
काही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलंय. (2 biggest symptoms of Omicron Variant completely different from other strains of corona know how to defend)
  
अशात या ओमायक्रॉन विषाणूची लक्षण नेमकी काय आहेत, तो पसरतो कसा? याबाबबत अनेक दावे केले जात आहेत. त्यामुळे या ओमायक्रॉनची लक्षणं काय आहेत, हे जाणून घेणं गरजेचं आहे.  

ही आहेत ओमायक्रॉनची लक्षणं

देशात जेव्हा पहिल्यांदा कोरोनाचा फैलाव झाला होता, तेव्हा सर्दी-खोकला हे या विषाणूची प्राथमिक लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं. मात्र ओमयक्रॉनबाबत तसं काही नाही. जरी ओमायक्रॉनची बाधा झाल्यानंतर पहिले दोन ते तीन दिवस सर्दी-खोकला होत असेल. 

ओमाक्रॉनचे 2 प्रमुख लक्षणं आहेत. पहिलं डोकेदुखीचा त्रास होते. त्यानतंर थकवा (Headache and Fatigue) जाणवतो. त्यामुळे हे दोन्ही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील, तर वेळीच सावध व्हा. 

आणखी काही लक्षणं आहेत का? 

डोकेदुखी आणि थकव्या व्यतिरिक्त ओमायक्रॉनचे अनेक लक्षणं असल्याचं म्हंटलं जात आहे. ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत निश्चित धोकादायक नाही. मात्र हलगर्जीपणा करुन चालणार नाही. 

ओमायक्रॉनच्या काही सूक्ष्म लक्षणांमध्ये साधारण तापाचा समावेश आहे. जो ताप उपचाराविना उतरतो. तसेच गळ्यात खवखव आणि अंगदुखी ही ओमायक्रॉनची लक्षणं आहेत. विशेष म्हणजे ओमायक्रॉनमध्ये कोरोनाप्रमाणे वास न येणं आणि तोंडाची चव जाण्यासारखी लक्षणं नाहीत.  

ओमायक्रॉनपासून स्वत:चा बचाव कसा कराल?

ओमायक्रॉनपासून स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी कोरोना लसीचे 2 डोस घेणं महत्त्वाचं आहे. यास कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पूर्णपणे पालन करायलं हवं.