महेश कोठारे चित्रपट महोत्सव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

झी टॉकीज साजरा करणार कोठारेंचा ६७ वा वाढदिवस

Updated: Sep 28, 2020, 11:33 AM IST
महेश कोठारे चित्रपट महोत्सव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित चित्रपट निर्माता, दिग्दर्शक म्हणून महेश कोठारे आपल्या सर्वांनाच परिचित आहेत. थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला या सारखे अनेक सुपरहिट चित्रपट महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केले आहेत. २८ सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांचे लाडके महेश कोठारे वयाच्या ६७ व्या  वर्षात पदार्पण करत आहेत. या निम्मित झी टॉकीज ने एका विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांना महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.

या चित्रपट महोत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता 'धुमधडाका' या चित्रपटाने होणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डें, अशोक सराफ आणि महेश कोठारे या त्रिकुटाच्या अभिनयाने हा सिनेमा गुंफलेला आहे. या नंतर ११ वाजता 'दे दणादण' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डें यांनी या चित्रपटात एका हवालदाराची भूमिका साकारली आहे. तर महेश कोठारे हे पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत. आदिनाथ कोठारे याचा पदार्पणातील 'माझा छकुला' आपल्या सर्वांच्याच लक्षात आहे.

या सिनेमामध्ये महेश कोठारे निवेदिता सराफ, लक्ष्मीकांत बेर्डें, पूजा पवार, अविनाश खर्शीकर, विजय चव्हाण या कलाकारांच्या लक्षवेधी भूमिका आहेत. दुपारी १.३० वाजता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्या सिनेमा मराठी सिनेसृष्टी मध्ये इतिहास रचला असा आपल्या सर्वांचा आवडता विनोदी थरारपट म्हणजे 'झपाटलेला'. संध्याकाळी ७ वाजता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपट महोत्सवाचा शेवट 'थरथराट' या सुपरहिट सिनेमाने होणार आहे. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डें, निवेदिता सराफ या कलाकारांच्या या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका आहेत.

 या सगळ्या सुपरहिट सिनेमांचा आस्वाद घेण्यासाठी पाहायला विसरुनका 'महेश कोठारे चित्रपट महोत्सव' २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.