इंग्रजी बोलता येत नसलेल्या अनुपमा खऱ्या आयुष्यात शिकलीये ईतकी! जाणून तुम्ही व्हाल थक्क

स्टार प्लसचा लोकप्रिय शो अनुपमामध्ये मुख्य भूमिका साकारून घराघरात लोकांच्या मनावर राज्य करणारी रुपाली गांगुली लहानपणापासूनच शोबिज इंडस्ट्रीत सक्रिय आहे.

Updated: Aug 27, 2022, 12:15 AM IST
इंग्रजी बोलता येत नसलेल्या अनुपमा खऱ्या आयुष्यात शिकलीये ईतकी! जाणून तुम्ही व्हाल थक्क  title=

मुंबई : स्टार प्लसचा लोकप्रिय शो अनुपमामध्ये मुख्य भूमिका साकारून घराघरात लोकांच्या मनावर राज्य करणारी रुपाली गांगुली लहानपणापासूनच शोबिज इंडस्ट्रीत सक्रिय आहे. रुपालीचे वडील चित्रपट दिग्दर्शक होते, बालपणी रुपालीने त्यांच्या चित्रपटातून पदार्पण केलं.

अनुपमामध्ये रुपाली गांगुली खूपच कमी शिकलेली दाखवण्यात आलं आहे, पण खऱ्या आयुष्यात ती पदवीधर आहे. 5 एप्रिल 1977 रोजी रूपाली गांगुलीचा जन्म कोलकाताचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनिल गांगुली यांच्या घरात झाला. तिचे वडील केवळ चित्रपट दिग्दर्शकच नव्हते तर पटकथा लेखकही होते. रुपालीचं लग्न अश्विन वर्मासोबत झालं आहे. जो एक बिझनेसमन आहे.

रुपालीला एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव रुद्रांश आहे. अनुपमामध्ये कमी शिकलेल्या मुलीची भूमिका साकारणारी रुपाली गांगुली हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवीधर झाली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रुपाली थिएटरमध्ये दाखल झाली. रुपालीची अभिनयशैली यामुळे चांगलीच भक्कम झाली.

वयाच्या ७ व्या वर्षी रुपाली गांगुलीने साहेब चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर रुपाली तिच्या वडिलांच्या बच्चन या चित्रपटात दिसली. रुपालीने 2000 मध्ये सुकन्या चित्रपटाद्वारे टीव्हीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने आतापर्यंत अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.