'हो मी त्यांच्या प्रेमात आहे' रेखा यांचा अमिताभ यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा

रेखा आणि अमिताभ त्यांच्या चित्रपटातील केमिस्ट्रीमुळे नाही तर त्यांच्या ऑफस्क्रिन असलेल्या केमिस्ट्रीमुळेही चर्चेत होते.

Updated: Dec 22, 2022, 12:04 AM IST
'हो मी त्यांच्या प्रेमात आहे' रेखा यांचा अमिताभ यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूडस्टार अमिताभ बच्चन त्यांच्या जबरदस्त अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांचं प्रसिद्ध अभिनेत्री रेखासोबत अफेअर होतं. बिग बी आणि रेखा यांच्या अफेअरशी संबंधित अनेक किस्से आजही ऐकले जातात. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांची जोडी ही एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 

रेखा आणि अमिताभ त्यांच्या चित्रपटातील केमिस्ट्रीमुळे नाही तर त्यांच्या ऑफस्क्रिन असलेल्या केमिस्ट्रीमुळेही चर्चेत होते. शूटिंग करत असताना ते एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा ही सुरु झाल्या.

रेखा अमिताभ यांच्यावर जीवापाड प्रेम करायच्या आणि ज्याचा स्विकार त्यांनी बऱ्याचदा केला आहे. मात्र अमिताभ यांनी त्यांच्या आणि रेखाच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे काही कधी सांगितलं नाही. एकदा रेखा यांना बिग बींसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला असता, अभिनेत्रीने आश्चर्यकारक उत्तर दिलं.

रेखा यांच्या या वक्तव्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं
'तुम्हाला अमिताभ बच्चन आवडतात का?' या प्रश्नाला उत्तर देत रेखा म्हणाल्या, "हो नक्कीच, मी त्यांच्या प्रेमात आहे. हा खूप बालिश प्रश्न आहे. मला आत्तापर्यंत त्यांच्यासारखा एकही पुरुष किंवा स्त्री भेटली नाही जिने असं म्हटलंय की, आम्हाला अमिताभ आवडत नाहीत. मग मी हे कसं म्हणेन." रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरची फिल्म इंडस्ट्रीत खूप चर्चा होती. रेखा यांनी अनेकवेळा आपलं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं, पण या नात्यावर बिग बींनी नेहमीच मौन पाळलं. 

काही वर्षांपूर्वी रेखा यांनी एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांनी बिग बींसोबत कोणतेही वैयक्तिक संबंध नसल्याचं सांगितलं होतं. रेखा यांच्या या खुलाशामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.आजही त्यांचा प्रेमकहाणीचे अनेक किस्से ऐकले जातात. आताच्या पिढीलाही अमिताभ आणि रेखाच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं.