'सगळं जाईल अन् तुझ्याकडे काम नसेल', जितेंद्र अर्शद वारसीला असं का म्हणाले होते?

Arshad Warsi and Jeetendra: बॉलिवूड कलाकार अर्शद वारसी (Arshad Warsi) याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. अभिनेता जितेंद्र (Jeetendra) याने जे काही म्हटलं होतं, त्यावर अर्शदने सर्वांसमोर वक्तव्य केलंय.

Updated: Jul 10, 2023, 05:47 PM IST
'सगळं जाईल अन् तुझ्याकडे काम नसेल', जितेंद्र अर्शद वारसीला असं का म्हणाले होते? title=
Arshad Warsi On Actor Jeetendra

Arshad Warsi On Actor Jeetendra: प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतो. काही वेळा आयुष्यात चाललंय काय हेच कळत नाही. या वाईट काळात खुप जवळचे लोक देखील मदत करत नाहीत. मानसिकृष्ट्या खचलेल्या काळात कोणाची साथ किंवा वडिलधाऱ्या लोकांचा सल्ला मिळणं महत्त्वाचं असतं. तुमचा जॉब कोणताही असो... कामाचा लोड असतोच. बॉलिवूडचे कलाकार (Bollywood actor) देखील याला मुकलेले नाहीत. अशातच बॉलिवूड कलाकार अर्शद वारसी (Arshad Warsi) याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. अभिनेता जितेंद्र (Jeetendra) याने जे काही म्हटलं होतं, त्यावर अर्शदने सर्वांसमोर वक्तव्य केलंय.

काय म्हणाला अर्शद वारसी? 

सर्व काही एक दिवस निघून जाईल. तुला काही काम नसेल त्यामुळेहीच ती वेळ आहे जेव्हा तुला खंबीर व्हावं लागेल, हिंमत ठेवावी लागेल. जेव्हा तुमच्याकडे काहीच नसेल आणि त्या वेळी तुम्ही धीर खचलात तर तेव्हा तुम्ही आणखी खाली जाल आणि पुन्हा कधीही उठू शकणार नाही, असा सल्ला जितेंद्र यांनी अर्शद वारसीला दिला होता. जेव्हा आपण चुकीचा निर्णय घेऊ लागतो आणि चुकीचे चित्रपट करू लागतो आणि अशा गोष्टी करू लागतो जे करायला नको होते आणि एकदा केले तर पुन्हा वर येणं खूप अवघड असतं, असंही जितेंद्र यांनी अर्शद वारसीला सांगितलं होतं.

अर्शद वारसी याने एका इंस्टाग्रामवरील चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, तेरे मेरे सपने हिट झाल्यानंतर त्याने अनेक चित्रपट (Arshad Warsi Movies) साइन केले होते. त्यानंतर एक पार्टी आयोजित केले होती त्यावेळी जितेंद्र एका पार्टीत भेटले होते. तेव्हा त्यांनी अर्शदला सल्ला दिला होता. तो सल्ला मी कायम लक्षात ठेवला, असंही अर्शद सांगतो.

आणखी वाचा - ती होती कोण? किम कार्दशियन एकटी असताना सेल्फीत कैद झाली रहस्यमय सावली; उडाली खळबळ!

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या प्रॉडक्शनचा चित्रपट 'तेरे मेरे सपने' या चित्रपटामधून अर्शद वारसीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'तेरे मेरे सपने हा चित्रपट 1996 साली आला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून अर्शद सर्वांच्या नजरेत आला होता. अर्शद वारसी नुकताच 'असुर 2' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. गेले 15 वर्ष तो बॉलिवूडमध्ये संघर्ष करताना दिसतोय. अशातच आता त्याच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसते.