'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने केला नवा रेकॉर्ड

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध सीरियल्सची नावे घेतली तर त्यात ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे नाव येतेच. या मालिकेची प्रसिद्धी पाहता ही मालिका ९ वर्षांपासून सुरु आहे असे वाटत नाही. ही मालिका टीआरपीमध्येही बऱ्याचदा अव्वल होती. 

Updated: Oct 16, 2017, 07:20 PM IST
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने केला नवा रेकॉर्ड title=

मुंबई : टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध सीरियल्सची नावे घेतली तर त्यात ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे नाव येतेच. या मालिकेची प्रसिद्धी पाहता ही मालिका ९ वर्षांपासून सुरु आहे असे वाटत नाही. ही मालिका टीआरपीमध्येही बऱ्याचदा अव्वल होती. 

मालिकेतील अनेक कलाकार बदलले असले तरी या मालिकेची लोकप्रियता कमी झाली नव्हती. या मालिकेने नवा रेकॉर्ड केलाय. या मालिकेने आतापर्यंत २५०० एपिसोड पूर्ण केलेत. एवढे एपिसोड पूर्ण करणारी टीव्ही जगतातील ही पहिलीच व्यवसायिक मालिका आहे. 

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेला मोठी टक्कर आहे ती तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची. सब टीव्हीवरील या मालिकेने आतापर्यंत २३१४ एपिसोड पूर्ण केलेत.