विद्याच्या ‘तुम्हारी सुलू’तील जबरदस्त गाणं रिलीज

काही दिवसांआधी विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यामुळे विद्याच्या जबरदस्त अदाकारीची उत्सुकता नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा वाढली आहे.

Updated: Oct 16, 2017, 08:03 PM IST
विद्याच्या ‘तुम्हारी सुलू’तील जबरदस्त गाणं रिलीज title=

मुंबई : काही दिवसांआधी विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यामुळे विद्याच्या जबरदस्त अदाकारीची उत्सुकता नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा वाढली आहे.

ट्रेलरची नशा ताजी असतानाच आता या सिनेमात गाणं रिलीज करण्यात आलंय. विद्याने पुन्हा एकदा या गाण्याच्या माध्यमातून आपल्या मोहक अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. 

‘बन जा राणी’ असे बोल असलेलं हे गाणं रोमॅंटिक असून या गाण्याने सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. सिनेमाच्या कथानकाने आधीच उत्सुकता वाढली असताना या गाण्याने विद्याची अदाकारी बघण्याची उत्सुकता वाढवली आहे. जास्त अश्लीलता नसूनही हे गाणं खूप हॉट झालं आहे. 

या सिनेमाचं दिग्दर्शन सुरेश त्रिवणीने केलं आहे. विद्याने या सिनेमात हाऊसवाईफची भूमिका साकारली आहे. ती या सिनेमात एका लेटनाईट रेडिओ जॉकीची भूमिका यात साकारत आहे.