'मला अंधारात बोलवलं आणि माझ्यासोबत...' रणवीर सिंगनने सांगितला धक्कादायक अनुभव

रणवीर सिंगला देखील कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. याबाबत आता अभिनेत्याने खुलासा केला आहे. 

Updated: Jan 29, 2023, 04:05 PM IST
'मला अंधारात बोलवलं आणि माझ्यासोबत...' रणवीर सिंगनने सांगितला धक्कादायक अनुभव title=

मुंबई :  एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन हिंदी चित्रपटसृष्टीत खास ओळख निर्माण करणारा रणवीर सिंग हा बॉलीवूडचा एक हुशार अभिनेता आहे. या इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी या अभिनेत्याने बराच काळ संघर्ष केला आहे मात्र तुम्हाला माहित आहे का की, रणवीर सिंगला देखील कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. याबाबत आता अभिनेत्याने खुलासा केला आहे. रणवीर सिंगने सांगितलं आहे की, एका निर्मात्याने त्याला स्मार्ट आणि सेक्सी असल्याचं सांगितलं आहे.

अलीकडेच, रणवीर सिंग मार्राकेश इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाला होता, जिथे रणवीरला फिल्म फेस्टिव्हलमध्ये  एटोइले द ओर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. यावेळी रणवीरने एक भाषण दिलं, ज्यामध्ये अभिनेत्याने त्याचा कास्टिंग काउचचा अनुभव जगासोबत शेअर केला. यावेळी रणवीर सिंग म्हणाला, 'एकदा एका निर्मात्याने मला फोन केला.

त्या प्रोड्यूसरने मला चित्रपटात काम देणार असं सांगितलं. त्यानंतर त्या निर्मात्याने दुसऱ्या व्यक्तीमार्फत मला एका अंधाऱ्या ठिकाणी बोलावलं. मग तो माणूस मला म्हणाला की, तू मेहनती आहेस की हुशार आहेस? 'मी स्वतःला हुशार समजत नाही म्हणून मी त्याला मी म्हणालो की मी मेहनती आहे. यापुढे तो प्रोड्यूसर त्याला म्हणाला आधी स्मार्ट बन, सेक्सी हो?''

याच्या पुढे रणवीर सिंगने आपलं बोलणं चालू ठेवत सांगितलं की, त्या दिवसांत तीन ते साडेतीन वर्ष मी अशा गोष्टींचा सामना केला आहे. आता मला वाटलं की,  आता हीच वेळ होती, ज्याने मला आज मिळत असलेल्या संधीची  किंमत समजावली. एवढंच नाही तर रणवीरने असंही सांगितलं की, निर्मात्याने त्याच्या मागे कुत्रेही सोडले होते. अभिनेत्याने त्या निर्मात्याचं नाव सांगितलं नाही. पण तो आता या जगात नाही असं तो म्हणाला.

वर्क फ्रंटवर बोलायचं झालं तर, रणवीर सिंग आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'सर्कस' मध्ये दिसणार आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' करण जोहरने दिग्दर्शित केला असून रणवीर सिंग या चित्रपटात आलियासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. त्याचबरोबर 'सर्कस'चं दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे.