Radhika Apte: सामाजिक आणि धार्मिक किंवा कुठलेही संवेदनशील विषय हाताळताना चित्रपटकर्मीना योग्य ती काळजी घेणे हे बंधनकारक आहे असं आपण अनेकदा म्हणतो. त्यातून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जातेही. त्यातून सेन्सॉर बोर्ड असल्यानं ही काळजी वेळोवेळी घेतली जाते. सध्या जमाना हा ओटीटीचा आहे त्यातून डिजिटल मनोरंजनाची व्यावसायिक आणि इतरत्र गणितंही फार बदलली आहेत. वेगवेगळे विषय हे आपल्या भेटीला येत आहेत त्यातून बेधडक विषयही प्रेक्षकांसमोर येताना दिसत आहे. 2019 साली Made In Heaven ही वेबसिरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता चर्चा आहे ती म्हणजे या सिरिजच्या दुसऱ्या सिझनची. त्यामुळे सध्या ही सिरिज चांगलीच गाजते आहे. परंतु यातील ep 5 मध्ये अभिनेत्री राधिका आपटेच्या एपिसोडवरून सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
Made in Heaven चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. त्यामुळे सध्या या वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या सिरिजच्या पाचव्या एपिसोडमधील एका सीनमुळे पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. यावेळी एका लोकप्रिय लेखिकेनं यावर आक्षेप घेतला आहे. त्यांचे नावं यशिका दत्त असं आहे. काल सोशल मीडियावर तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं आपले मुद्दे सविस्तर स्पष्ट केले आहेत. ती म्हणाली आहे की, ''एक दलित कुटुंबियातील मुलगी म्हणून मी आणि माझ्या आईनं एक आतला विनोद चर्चिला होता. तो असा होता की आपलं आयुष्य हे इतकं गुंतागुंतीचे आहे की यावर एक चित्रपट निघायला हवा. आम्हा दोघींना माहिती होतं की हे कधीच सत्यात उतरणार नाही. आमच्यासारख्या दलितांची कहाणी ही रूपेरी पडद्यावर आलीच नव्हती. त्यातून त्यांचा संघर्ष समोर आलाच नव्हताच. मी 2016 पासून खऱ्या अर्थी दलित म्हणून समाजासमोर आले होते. त्यावेळी एका वेगळ्या संघर्षांतून बाहेर आल्यानंतर समाजात गर्वानं वावरणं ही प्रक्रिया समोर आणणारे काही शब्द नव्हते.''
या पुढे त्या म्हणाल्या की, ''आज 2023 मध्ये हे दोन्ही आहे. दलित दिग्दर्शक नीरज घ्यायवान यांनी मात्र बॉलिवूडमध्ये वेगळी क्रांती आणि हे चित्रच पालटले. त्याचसोबत हे चित्र साऊथ इंडियन चित्रपटांमध्येही होते. त्यातून याचा प्रत्यय आपल्याला Made in Heaven च्या दुसऱ्या सिझनच्या पाचव्या एपिसोडमध्ये पाहायला मिळते आहे.''
''या सीनमध्ये असं दाखवलं आहे की, एक दलित लेखिका जी कोलंबियाला असते. तिनं Coming Out नावाचं एक पुस्तकं लिहिलं आहे. एका शोमध्ये ती या पुस्तकाविषयी बोलते आहे. ज्यात मी स्वत:लाच पाहते आहे असं वाटतं, खरंतर ती मी नाही पण मी तीच आहे. राधिका आपटेच्या पात्रातून माझे शब्द होते परंतु माझं नावं नव्हतं. त्यामुळे माझं काम, जे मी केलं आहे ज्यासाठी मी बोलले ते मात्र माझं कुठेही नावं, श्रेय न घेता वापरलं आहे. अशाप्रकारानं मी आतापर्यंत जे काही मेहतनीनं कमावलं आहे ते हा एपिसोड पाहून या सिरिजनं तेही पुसून टाकल्यासारखे वाटते.''अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात त्यांनी आव्हान केले आहे की, याद्वारे त्यांचे नावं द्यावे, त्यांचे श्रेय द्यावे आणि अशा अनेकांना तो न्याय द्यावा जे अनेक वर्षे या लढ्यासाठी झगडले आहेत.