लॉकडाऊनमध्ये आपल्या फिटनेसकडे असं लक्ष देतेय प्रणती राय प्रकाश

लॉकडाऊनमध्ये फिटनेसकडे विशेष लक्ष

Updated: May 28, 2020, 04:53 PM IST
लॉकडाऊनमध्ये आपल्या फिटनेसकडे असं लक्ष देतेय प्रणती राय प्रकाश title=

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॉल, जिम, योगा स्टुडिओ आणि वर्क स्पेस यासारखी सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातच वेळ घालवावा लागत आहे. चित्रपटाची शूटींग देखीलं बंद आहे. चित्रपटांची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सेलिब्रिटी आपल्या कुटुंबासह आणि प्रियजनांबरोबर घरीच वेळ घालवत आहेत.

लॉकडाऊनला २ महिन्यापेक्षा अधिक दिवस झाले आहे. त्यामुळे जिम आणि शूटींग देखील बंद आहे. बॉलीवूड सेलेब्रिटी प्रणती सुद्धा घरी असली तरी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. हॉट आणि सिझलिंग फोटोस मध्ये तिचा फिटनेस दिसतो. पण त्यासाठी ती मेहनत देखील घेते. \

प्रणती ही कॉलेजच्या काळात ऍथलिट होती. ती लॉन्ग जंप खेळांमध्ये विजेती होती. याबाबतचे तिने काही फोटोही शेअर केले आहेत.

प्रणतीने "लव आज कल", फॅमिली ऑफ ठाकूरगंज" आणि "ऑड कपल्स" सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतीच आलेली वेब सिरीज "मनफोडगंजकि बिन्नी" मधून तिने अनेकांचं मन जिंकलं होतं.