काकांकडून लैंगिक शोषण ते वेश्याव्यवसाय डिझायनरचा धक्कादायक खुलासा!

डिझायनरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. 

Updated: Sep 5, 2022, 06:02 PM IST
काकांकडून लैंगिक शोषण ते वेश्याव्यवसाय डिझायनरचा धक्कादायक खुलासा! title=

मुंबई : लोकप्रिय फॅशन डिझायनर रोहित वर्मा (Rohit Verma) हा ‘बिग बॉस 3’चा स्पर्धक आहे. शो दरम्यान रोहितनं त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रोहितनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या वेळी रोहितनं खुलासा केला की लहानपणी जवळच्या मित्रांनी त्याचं 3-4 वर्ष त्याचं लैंगिक शोषण केलं. याशिवाय वेश्याव्यवसायातून पैसे कमवून डिझायनिंगच्या वस्तू विकत घेतल्या आणि अशा अनेक गोष्टींविषयी खुलासा केला आहे. (Worked As Prostitute My Uncle Raped Me At Age Of 8 Know Horrific Sexual Abuse Caused To Designer Rohit Verma)

आणखी वाचा : 'चोली के पीछे क्या है'वर ठुमका धरताच काही मुलं आली आणि...; सपना चौधरीसोबत घडला अनपेक्षित प्रकार, Video Viral

सिद्धार्थ कानननं रोहितला शोमध्ये विचारलं की तो पुरुष कलाकारांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे का? आणि ते लोक सगळ्यांसमोर ते होमोसेक्शुअल आणि बायसेक्शुअल (Homosexual and Bisexual) असल्याचे बोलतात का? या प्रश्नावर उत्तर देत रोहित म्हणाला, 'माझा विश्वास आहे की प्रत्येकजण बायसेक्शुअल आहे. काही लोक त्याबद्दल उघडपणे बोलतात तर काही उघडपणे बोलत नाहीत. मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि मी ते नाकारणार नाही. काही लोक हे लपूनछपून करतात. ही गोष्ट उघडपणे बोलण्याची मी मोठी किंमत मोजली आहे.'

आणखी वाचा : पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या कुत्र्याला मदत करायला गेला अन्..., पाहा Viral Video

पुढे रोहित,म्हणाला 'अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत अनेक महिन्यांपासून रिलेशनशिप आहे आणि लिव्हइनमध्येही राहिलो आहे. तर एकदा रोहित त्याच्या बॉयफ्रेंडसाठी करवा चौथचा उपवास करत होता. त्याचा बॉयफ्रेंड आला नाही तर शोधण्यासाठी रोहित डिस्कोमध्ये गेला. इतकंच काय तर पार्किंगमध्ये पोहोचताच रोहितनं त्याच्या बॉयफ्रेंडला कारमध्ये एका मुलीसोबत सेक्स करताना पाहिले. 

आणखी वाचा : 'बाहुबली'साठी एस.एस.राजमौलींनी 'या' हॉलिवूड चित्रपटांचे सीन्स केले Copy? Video Viral

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : बाप्पाच्या दर्शनासाठी तोकडे कपडे घातले म्हणून..., सेलिब्रिटीसोबत मंडळानं केलं असं काही; पाहा Video
पुढे रोहित म्हणाला, 'त्यानंतर तो शांतपणे घरी गेला आणि पहाटेच्या चारच्या सुमारास अभिनेता परत आला. मग, उशिर का झाला असा प्रश्न विचरता शूटिंगमध्ये व्यस्त होतो असे त्यानं सांगितले.'

वेश्याव्यवसायाविषयी सांगताना रोहित म्हणाला, 'मी मुंबईत आलो तेव्हा पैशांची गरज होती. मुलींसारखे कपडे घालून ताजभोवती फिरायचोय लोकांनी एक-दोनवेळा मला सोबत नेले, त्यातून मिळालेल्या पैशातून डिझायनिंगचा सामान घेतला आणि या गोष्टीचा मला पश्चात्ताप नाही. कारण मला ते करायचं होतं म्हणून मी केलं कोणीही जबरदस्ती केली नव्हती. 

आणखी वाचा : मद्यधुंद अवस्थेत पूनम पांडेकडून रेस्टॉरंटमध्ये तोडफोड, Viral Video पाहून कोणीही संतापेल

पुढे त्याच्या बालपणाविषयी सांगताना रोहित म्हणाला, 'मी खूप चांगल्या कुटुंबातील आहे,पण माझ्या कुटुंबातील सदस्य खूप जुन्या विचारांचे आहेत. माझा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला असला तरी, लहानपणी माझ्या सख्या काकांनी माझे लैंगिक शोषण केले. वयाच्या आठव्या वर्षी माझ्याच काकांनी माझ्यावर बलात्कार केला. ते मला साडी नेसायला सांगायचे. माझ्या अंगावर गरम मेण घालायते आणि अश्लील कृत्य करायचे. हे सर्व तीन-चार वर्षे सुरु होते. मी माझ्या आई-वडिलांना याबाबत कधीच सांगितले नाही.'