करिना 'डान्स इंडिया डान्स' नंतर पुन्हा पडद्यावर झळकेल का?

'डान्स इंडिया डान्स' रियालिटी शोमध्ये परिक्षकाची धुरा सांभाळत आहे.

Updated: Sep 13, 2019, 02:14 PM IST
करिना 'डान्स इंडिया डान्स' नंतर पुन्हा पडद्यावर झळकेल का?  title=

मुंबई : मोठ्या पडद्यावर आपल्या कौशल्याची छाप सोडलेली अभिनेत्री करिना कपूरने छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. सध्या ती 'डान्स इंडिया डान्स' रियालिटी शोमध्ये परिक्षकाची धूरा सांभाळत आहे. परिक्षकाच्या गादीवर बसलेली बेबो चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. त्याचप्रमाणे शोमधील तिच्या अदा सर्वांच घायाळ करत आहे. एकंदरीत तिच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. 

पण या शो नंतर करिना पुन्हा छोट्या पडद्यावर झळकेल का? हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. बॉलिवूडमध्ये उत्तम रित्या सक्रीय झाल्यानंतर करिनाला आणखी रियालिटी शो करण्याची इच्छा आहे. त्याचप्रमाणे बेबो अनेकांच्या प्रेरणास्थानी देखील आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Can you guess this song and from which movie it wa

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार जास्त रियालिटी शोमध्ये झळकण्याचा करिनाचा मानस आहे. मोठ्या पडद्यावरून ती थेट छोट्या पडद्याकडे सक्रीय झली आहे. जेव्हा तिने 'डान्स इंडिया डान्स' मध्ये परिक्षकाच्या पदावर विराजमान झाल्यानंतर छोट्या पडद्यावर सर्वात जास्त मानधन स्वीकारणारी अभिनेत्री ठरली आहे.

या शोमध्ये ती फक्त एका भागासाठी तब्बल ३ कोटी रूपयांचे मानधन स्वीकारत आहे. 'मला असं वाटतं अभिनेत्रींना सुद्धा समान हक्क मिळायला हवा. मला समानतेवर विश्वास आहे.' असं म्हणतं तिने समानतेचा संदेश दिला आहे. 

करिना लवकरच अभिनेता अक्षय कुमार सोबत 'गुड न्यूज' चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाची शूटींग देखील पूर्ण झाली आहे. मोठ्या कालावधी नंतर हे दोन कलाकार पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता इरफार खान सोबत 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटात भूमिका साकारणार आहे.