... म्हणून अनुप सोनी 'क्राईम पेट्रोल' सोडणार?

गेली 8 वर्ष सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा 'क्राईम पेट्रोल' या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अनूप सोनी आणि 'क्राईम पेट्रोल' हे समीकरण अगदी पक्कं झालं आहे. मात्र आता अनूप लवकरच या कार्यक्रमापासून दूर जाणार आहे असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. 

Updated: Mar 23, 2018, 05:39 PM IST
... म्हणून अनुप सोनी 'क्राईम पेट्रोल' सोडणार?  title=

मुंबई : गेली 8 वर्ष सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा 'क्राईम पेट्रोल' या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अनूप सोनी आणि 'क्राईम पेट्रोल' हे समीकरण अगदी पक्कं झालं आहे. मात्र आता अनूप लवकरच या कार्यक्रमापासून दूर जाणार आहे असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. 

अनूप सोनी सोडणार मालिका ? 

स्पॉटबॉय या वेबपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, अनुप सोनीने मालिका सोडण्यासाठी नोटीस दिली आहे. लवकरच सोनी या कार्यक्रमापासून दूर जाणार आहे. 

कारण काय ? 

अनुप सोनी खूप वर्ष सलग टेलिव्हिजनमध्ये असल्याने त्याला आता पुन्हा मालिका किंवा सिनेमांमध्ये परतण्याची इच्छा आहे. त्यामुळे तो या शोपासून दूर होत आहे. अशी चर्चा आहे. 

अनुप सोनी सध्या त्याच्यामधील कलाकाराला मिस करतो. गेल्या 5 वर्षांपासून मी अभिनय करत नाही. फिल्म आणि टीव्ही शोजला मी मिस करतोय असे त्याने म्हटं आहे. चाहतेदेखील अनुप सोनीच्या या निर्णयाचे स्वागत करतील अशी त्याला आशा आहे. त्यामुळे लवकरच मोठ्या पडद्यावर 
अनुप सोनीला पाहता येईल. 

माझ्यातील अभिनेत्याला मारू इच्छित नाही - अनुप सोनी 

अनुप सोनीला त्याच्यातील कलाकाराला मारण्याची इच्छा नाही. त्यामुळे वेळीच 'क्राईम पेट्रोल'पासून दूर जाऊन तो त्याच्यातील कलाकाराला नवी संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे असे त्याने म्हटले आहे. चाहतेदेखील अनुपला नव्या रूपात पाहण्यासाठी सज्ज असतील अशी त्याला आशा आहे.