खुलासा! लग्न सोहळा झाल्यानंतरही दुबईत का थांबल्या होत्या श्रीदेवी

 बोनी कपूर आणि श्रीदेवी हे भाचा मोहित मारवाहच्या विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेले होते. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 27, 2018, 04:28 PM IST
खुलासा! लग्न सोहळा झाल्यानंतरही दुबईत का थांबल्या होत्या श्रीदेवी title=

मुंबई : बोनी कपूर आणि श्रीदेवी हे भाचा मोहित मारवाहच्या विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेले होते. 

22 फेब्रुवारीला मोठ्या धुमधडाक्यात हा विवाह पार पडला. लग्न सोहळा झाल्यानंतर अनेक जण दुबईहून निघून गेले होते. बोनी कपूर देखील मुंबईला परत आले होते पण श्रीदेवी या तेथेच थांबल्या. अशातच प्रश्न उपस्थि केले जात होते की, श्रीदेवी या दुबईमध्ये का थांबल्या होत्या.

राज्यसभा खासदार आणि कपूर कुटुंबियांसोबत मैत्रीचे संबंध असलेले अमर सिंह यांनी म्हटलं की, श्रीदेवी दुबईमध्ये आपल्या पेटिंग्सचं प्रदर्शन भरवणार होत्या. काही पेटिंग्सचा ज्यामध्ये लिलाव होणार होता.

श्रीदेवी एक अॅक्टर सोबत एक चांगल्या डांसर आणि पेंटर देखील होत्या. श्रीदेवी यांनी सोनम कपूरचा पहिला सिनेमा सावरीयमधील एका पोजची पेंटिंग बनवली होती. आणि दूसरी पेंटिंग फेमस डांसर मायकल जॅक्सनची होती.