मुंबई : सलमान खान हा बॉलीवूडमधील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक आहे जो त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पिढ्यांसाठी ट्रेंडसेटर ठरत आहे. दबंग अभिनेता नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो.
त्याचे चित्रपट असो किंवा वादात अडकणे, सलमानबाबत नेहमीच मोठी चर्चा रंगताना दिसते. पण आणखी एक गोष्ट आहे ज्याबद्दल लोकांना जाणून घेण्यात खूप उत्सुकता आहे. ते म्हणजे प्रत्येक वेळी सलमान हातात घालत असलेलं ब्रेसलेट...
सलमान खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. त्याची प्रत्येक स्टाईल ही सगळ्याचं लक्ष वेधून घेणारी असते. त्यात सलमानचं ब्रेसलेट हे तो प्रत्येक लूक सोबत मॅच करताना दिसतो. तो आणि त्याचं हे ब्रेसलेट गेल्या कित्येक वर्षांपासून सोबत आहे.
सलमान खान, बऱ्याच काळापासून, चांदी आणि नीलमणी ब्रेसलेट परिधान करतो. हे त्याचे वडील सलीम खान यांनी त्यांना भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. तो नेहमी उजव्या हाताच्या मनगटावर ब्रेसलेट घालताना दिसतो. नीलमणी दगडापासून बनवलेल्या या ब्रेसलेटला सलमान आपला लकी चार्म मानतो आणि तो कधीही स्वतःपासून दूर ठेवत नाही.
सलमानने त्याच्यासाठी हे लकी ब्रेसलेट असल्याचे नमूद केल्यामुळे, त्याच्या अनेक चाहत्यांनी या ब्रेसलेटची कॉपी केली आहे. आणि स्वत: ही ते वापरु लागले. तो लवकरच एक लोकप्रिय फॅशन ट्रेंड बनला. सलमानने अलीकडेच त्याच्या वडिलांसोबत, त्याच्या Being Human या ब्रँड अंतर्गत ब्रेसलेट ऑनलाइन लाँच केले.