...यापुढे पत्नी करिनासोबत काम करण्यास सैफचा नकार

१६ ऑक्टोबर रोजी करीना-सैफच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झालेत

Updated: Oct 20, 2018, 11:33 AM IST
...यापुढे पत्नी करिनासोबत काम करण्यास सैफचा नकार title=

मुंबई : रिअल लाईफ जोड्या सिल्वर स्क्रीनवर पाहायला प्रेक्षकांना भले जास्त मजा येत असेल... पण, अभिनेता सैफ अली खाननं मात्र आपण यापुढे कधीही पत्नी करीना कपूर खानसोबत काम करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. ही गोष्ट प्रेक्षकांसाठी आणि सैफिनाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक असू शकते. पण, सैफनं यामागचं कारणही मीडियासमोर स्पष्ट केलंय. 

२०१२ साली आलेल्या 'एजन्ट विनोद' या सिनेमात सैफ आणि करीनाची जोडी एकत्र दिसली होती... त्यानंतर या दोघांना एकत्र सिनेमा केलेला नाही. 

मी यापुढे करीना कपूर खानसोबत कधीही काम करणार नाही... हे सैफचं वक्तव्य ऐकून कदाचित या दोघांच्या नात्यात काही बिनसलंय का? अशी शंका त्यांच्या चाहत्यांना येऊ शकते... पण, असं काहीही नाही... या निर्णयामागचं सैफचं कारण वेगळंच आहे. 

सैफ अली खान की दाढ़ी से इतना चिढ़ने लगे हैं नन्'€à¤¹à¥‡à¤‚ तैमूर, अब नहीं करते पापा को Kiss

करीना आणि मी एकमेकांसोबत खूप सहज वावरतो... आणि हीच सहजता चांगल्या सिनेमासाठी घातक ठरते, असं सैफनं एका मुलाखतीत म्हटलंय. सैफच्या म्हणण्यानुसार, अनोळखी लोकांसोबत काम करणं जास्त मजेशीर ठरतं... कारण हे एक स्वार्थी प्रोफेशन आहे.

१६ ऑक्टोबर रोजी करीना-सैफच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झालेत. या दोघांनी एलओसी, ओमकारा, कुर्बान, टशन आणि एजन्ट विनोद या सिनेमांत एकत्र काम केलंय.