....म्हणून संजू सिनेमात काम करण्यास तयार नव्हती मनिषा कोईराला!

पण एकीने आयुष्याची लढाई जिंकली तर दुसरी हरली.

Updated: Jun 27, 2018, 06:47 PM IST
....म्हणून संजू सिनेमात काम करण्यास तयार नव्हती मनिषा कोईराला! title=

मुंबई : दोन अभिनेत्री. दोघींनाही कॅन्सर झाला. पण एकीने आयुष्याची लढाई जिंकली तर दुसरी हरली. पण जी जिंकली तिला पुन्हा आयुष्यातील तेच दिवस जगायला सांगितले तर? तिच्यासाठी ते फारच कठीण असेल. हीच कठीण परिस्थिती मनिषा कोईरालासमोर आली. २९ जूनला प्रदर्शित होणारा संजय दत्तचा बायोपिक 'संजू'मध्ये  मनिषा कोईराला संजय दत्तच्या आईची म्हणजेच नर्गिसची भूमिका साकारत आहे. 

भूमिकेसाठी होणार देणे कठीण

एका मुलाखतीत मनिषाने सांगितले की, या भूमिकेसाठी होणार देणे तिच्यासाठी खूप कठीण होते. कारण नर्गिस यांनाही कॅन्सर झाला होता तर मनिषाही नुकतीच कॅन्सरमधून बाहेर पडली आहे. अशावेळी ही भूमिका म्हणजे तिच्यासाठी पुन्हा तेच दिवस जगणे होते. 

मनिषा कोईराला म्हणते...

मनिषाने सांगितले की, सुरुवातीला तिने या भूमिकेसाठी होणार दिला नव्हता. पण  दिग्दर्शक राजू हिरानी यांनी भूमिकेबद्दल समजवल्यावर तिने होकार दिला. संजू सिनेमा हा वडील सुनील दत्त आणि संजय दत्त यांच्या नात्याभोवती फिरणारा आहे. 
पुढे ती म्हणाली की, तो त्रास, ती वेदना, पीडा पुन्हा जगणे माझ्यासाठी सोपे नव्हते. नर्सिग यांची भूमिका साकारण्यासाठी खूप अधिक आत्मिक शक्तीची गरज होती. मी त्यांचे आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त त्यांच्यासारखे दिसणे आणि त्यांच्यासारखे केस सावरणे म्हणजे त्यांची भूमिका जमली असे नाही तर मला त्यांचा स्वभाव, त्यांचे मूळ समजून घ्यायचे होते. माझा प्रयत्न किती यशस्वी ठरला, हे लवकरच समजेल. त्याचबरोबर नर्गिस यांचा बायोपिक बनल्यास त्यात नक्कीच नर्सिगजी साकारायला आवडतील, असेही ती म्हणाली. 

सिनेमात या कलाकारांची वर्णी

कॅन्सरची लढाई जिंकल्यानंतर मनिषा कोईराला 'संजू' सोबत 'प्रस्थानम' नावाचा अजून एक सिनेमा करत आहे. संजू सिनेमात सुनील दत्त यांची भूमिका परेश रावल तर रणबीर कपूर संजय दत्त साकारत आहे. याशिवाय या सिनेमात अनुष्का शर्मा, दीया मिर्जा, सोनम कपूर यांसारखे कलाकार आहेत.