'त्या' वक्तव्यावरून Nayanthara चे चाहते करण जोहरवर भडकले..., जाणून घ्या प्रकरण

करण जोहर होतोय ट्रोलिंगचा शिकार...

Updated: Jul 24, 2022, 07:05 PM IST
'त्या' वक्तव्यावरून Nayanthara चे चाहते करण जोहरवर भडकले..., जाणून घ्या प्रकरण title=

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या सातव्या सीझनमुळे खूप चर्चेत आहे. दरम्यान, त्याने केलेल्या वक्तव्यामुळे दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या चाहत्यांना राग दिला आहे, ज्यानंतर तिचे  चाहते करणला सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत. दरम्यान, करणच्या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेताा अक्षय कुमारसोबत अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने हजेरी लावली होती.  

यादरम्यान समांथाने तिचे आयुष्य, करिअर आणि घटस्फोटाबद्दलही सांगितले. नयनताराच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, शोदरम्यान करण जोहरने नयनताराला समांथापेक्षा कमी लेखले होते, त्यानंतर करणला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे. शोच्या मध्यभागी करणने समंथाला विचारले, 'साऊथमध्ये अलीकडे सर्वात मोठी लोकप्रिय अभिनेत्री कोण आहे?'. निर्मात्याच्या या प्रश्नावर, समांथा तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कथुवाकुला रेंडू कादळ' या चित्रपटाचा संदर्भ देत म्हणाली, 'ठीक आहे, मी नयनतारासोबत नुकताच एक चित्रपट केला आहे.'

समांथाच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की नयनतारा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे, असा तिचा विश्वास आहे. दुसरीकडे, समांथाच्या उत्तरानंतर करण म्हणतो की 'माझ्या यादीत नाही!'. यानंतर, करणने Ormax मीडियाने देशातील Top अभिनेत्रीच्या दिलेल्या यादीचा उल्लेख केला, ज्यामध्ये समांथा ही देशातील पहिल्या क्रमांकाची अभिनेत्री होती. करण जोहरचे  वक्तव्य ऐकून नयनताराच्या काही चाहत्यांना खूप वाईट वाटलं.

एका नेटकऱ्याने कमेंट केली की, 'नयनतारा करीना आणि प्रियांका चोप्रा यांच्यापेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी जास्त प्रस्थापित नाही आहे का? करणचा काय प्रॉब्लेम आहे भाऊ?'. तर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली की करण दिग्दर्शित करत असलेला 'गुड लक जेरी' हा नयनताराच्या 'कोलामावू कोकिला' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

दरम्यान, आलिया भट्ट( Alia Bhatt), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींना समांथाने मागे टाकले आहे. अलीकडेच, PR एजन्सी Ormax ने जून 2022 चे रेटिंग दिले आहेत, ज्यामध्ये जून महिन्यात देशातील Top 10 लोकप्रिय अभिनेत्री कोण आहेत हे सांगण्यात आलं आहे. या यादीत दाक्षिणेतील कलाकारांचाही समावेश आहे. या रेटिंगमध्ये, Ormax Stars India Loves- सर्वात लोकप्रिय महिला सेलिब्रिटी, समांथा पहिल्या क्रमांकावर आहे आणि आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर नयनतारा (Nayantara) तिसऱ्या क्रमांकावर असून या यादीत काजल अग्रवाल, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, अनुष्का शेट्टी या अभिनेत्रींचा समावेश आहे.