ऐश्वर्या नारकर खरं नाव का लावत नाही? जाणून घ्या अभिनेत्रीचं खरं नाव

सध्या ऐश्वर्या नारकर झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोशल मीडियावरही ऐश्वर्या नारकर यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा ती तिचे फिटनेस असो वा फनी व्हिडिओ असो त्या सोशल मीडिवर शेअर करतात. मात्र यावेळी त्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत.

सायली कौलगेकर | Updated: Aug 16, 2023, 05:05 PM IST
ऐश्वर्या नारकर खरं नाव का लावत नाही? जाणून घ्या अभिनेत्रीचं खरं नाव title=

मुंबई : ऐश्वर्या नारकर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. सध्या ऐश्वर्या नारकर झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोशल मीडियावरही ऐश्वर्या नारकर यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा ती तिचे फिटनेस असो वा फनी व्हिडिओ असो त्या सोशल मीडिवर शेअर करतात. अनेकदा तिच्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या यांचे पती अविनाश सुद्धा दिसतात. अनेकदा हे कपल मस्ती करताना दिसतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच चांगलेच चर्चेत असतात. तर अनेकदा ते ट्रोलही होतात. ऐश्वर्या नारकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यावेळीही ऐश्वर्या नारकर चर्चेत आल्या आहेत.मात्र यावेळी चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. 

यावेळी ऐश्वर्या नारकर या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग (Ask me anythings) हे सेशन घेतलं. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना त्यांच्या मनातले प्रश्न विचारले यावेळी अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले. यावेळी एका चाहत्याने त्यांना त्यांच्या खऱ्या नावावरुन प्रश्न विचारला आहे. प्रश्न वितारत चाहता म्हणाला, तुम्हाला तुमचं कोणतं नाव जास्त आवडतं? ऐश्वर्या की पल्लवी. तुम्ही तुमचं खरं नाव का वापरत नाही? या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, ही दोन्ही नावं माझी खरीच आहेत. 

त्यामुळे ऐश्वर्या नारकर यांचं नाव पल्लवी आहे. जे फारसं कोणालाच माहिती नाही. आणि ते हे नाव फारस कुठे लावतही नाही. 

ऐश्वर्या यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी, श्रीमंतघरची सून या मालिकांमधील ऐश्वर्या यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  ये प्यार ना होगा कम, घर की लक्ष्मी बेटियां या हिंदी मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे.

ऐश्वर्यानं नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. गंध निशिगंधाचा, सोयरे सकळ,सोनपंखी या नाटकांमध्ये ऐश्वर्यानं काम केलं. तसेच तुच माझी भाग्य लक्ष्मी,कधी आचानक, अंक गणित आनंदाचे या मराठी चित्रपटांमधून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली. ऐश्वर्याची ताली ही वेब सीरिज काल रिलीज झाली. ऐश्वर्याच्या आगामी चित्रपट आणि मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. याचबरोबर ऐश्वर्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. वयाच्या 53व्या वर्षीही ऐश्वर्या यांनी स्वत:ला खूप फिट ठेवलं आहे.