'पालकत्व म्हणजे दडपण,' अनुष्का शर्मा आणि विराट कोहली असं का म्हणतायत?

बॅालिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विराट कोहली सोबत पालकत्व आणि मुलांना वाढवताना येणाऱ्या अडचणींवर मोकळेपणाने बोलली.   

Updated: Sep 5, 2024, 07:26 PM IST
'पालकत्व म्हणजे दडपण,' अनुष्का शर्मा आणि विराट कोहली असं का म्हणतायत? title=

बॅालिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या काही वर्षांनी त्यांना वामिका आणि अकाय ही दोन मुलं झाली. मात्र त्यांनी अजूनही त्यांच्या मुलांचे चेहरे मीडियासमोर आणले नाहीत. त्यांचे चाहते अनुष्का आणि विराटच्या मुलांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.  अनुष्का शर्मा मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विराट कोहली सोबत पालकत्व आणि मुलांना वाढवताना येणाऱ्या अडचणींवर मोकळेपणाने बोलली. 

अनुष्का शर्मा म्हणाली की,'पालकत्व निभावताना आपल्या चुकांना स्विकारणं आणि चुकांपासून शिकणं अत्यंत आवश्यक आहे.' अनुष्का असंदेखील म्हणाली की,' ते दोघे आपल्या मुलांसमोर चांगल्या वागण्यातून शिस्तीची उदाहरण ठेऊ इच्छितात. त्यांना त्यांच्या मुलांना परिपूर्ण बनवायचं नाही, कारण चुका प्रत्येकाकडून होतात.'

याविषयी पुढे बोलताना अनुष्का म्हणाली,'आम्ही आदर्श व्यक्ती नाही आणि हेच योग्य आहे. आम्ही सुद्धा कधी कधी तक्रारी करतो आणि मुलांसमोर कबूलसुद्धा करतो. कारण चुका कबूल केल्यामुळे मुलांमधील तणाव कमी होतो. जर मुलं असं समजू लागली की आईवडील नेहमी बरोबर आहेत तर त्यांच्यावर दडपण येतं'. अनुष्काने आईवडील झाल्यावर त्यांचं सामाजिक जीवन कसं बदललं याविषयीदेखील भाष्य केलं 

हेही वाचा: अमिताभ यांची गडगंज संपत्ती कोणाच्या वाट्याला? 13 वर्षांपूर्वीच बिग बींनी केला होता खुलासा

अनुष्का म्हणाली,'माझी मुलगी अजून खूप लहान आहे. मी तिला काही गोष्टी शिकवू शकत नाही. पालक त्यांचं आयुष्य कसं जगतात हे पाहून मुलं त्यांचं अनुकरण करत असतात. मुलं तेच शिकतात जे बघतात. जर आपल्याला वाटत असेल मुलांनी नम्र असावं तर आपल्यालादेखील त्यांच्यासमोर नम्रतेने वागायला हवं.'

'मुलांना आपल्या तऱ्हेने वाढू द्यायला हवं. त्यांना प्रेमाने योग्य वळण लावणं अत्यंत आवश्यक असतं. जर मुलं तुमच्यासमोर कोणाचा अपमान करत असतील तर तुम्ही त्यांना योग्य पद्धतीने समजावायला हवं. मुल पालकांकडे पाहून शिकत असतात. त्यामुळे त्यांना चांगल्या गोष्टी शिकवण अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पालक म्हणून स्वत:च आपण त्यांच्यासाठी आदर्श ठरायला हवं,' असंही तिने शेवटी सांगितलं.