मुंबई : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. दीपिकाने स्वत: याची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही बातमी त्यांच्या फॅन्सना दिली आहे. १४ आणि १५ नोव्हेंबर या दिवशी दोघेही विवाहबंधनात अडकणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा होती पण शेवटी त्यांनी या दिवशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला. यामागे देखील एक मोठं कारण आहे. रणवीर आणि दीपिका यांनी रामलीला या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पंसती दिली होती. यानंतर बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी पुन्हा प्रेक्षकांचं मन जिंकलं.
रामलीला हा सिनेमा १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटामुळे दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आले होते. त्यामुळे त्यांनी या दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. दोन्ही कुटुंबीय जोरदार तयारी करत आहेत.
इटलीमध्ये हा विवाह पार पडणार असून येथेच सर्व कार्यक्रम देखील पार पडणार आहेत. पण माध्यमांना या लग्नापासून दूर ठेवलं जाणार आहे. दीपिका आणि रणवीरने कधीही आपलं नातं जगासमोर मान्य केलं नाही. पण आता त्यांनी स्वत:च लग्नाची तारीख जाहीर केली आहे.