Rakhi Sawant Marriage: वयाने 17 वर्षे मोठ्या राखीसोबतच आदिलने का केलं लग्न? कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का...

Rakhi Sawant: काही दिवसांपुर्वी राखी सावंतच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. आपल्या बॉयफ्रेंड आदिलशी तिनं लग्न केल्याचे समोर आले. त्यांच्या लग्नाचे काही फोटोही व्हायरल झाले होते. तेव्हा राखीच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या होत्या.

Updated: Jan 21, 2023, 04:35 PM IST
Rakhi Sawant Marriage: वयाने 17 वर्षे मोठ्या राखीसोबतच आदिलने का केलं लग्न? कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का... title=

Rakhi Sawant and Adil Khan Age Difference: काही दिवसांपुर्वी राखी सावंतच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. आपल्या बॉयफ्रेंड आदिलशी (Adil Khan) तिनं लग्न केल्याचे समोर आले. त्यांच्या लग्नाचे काही फोटोही व्हायरल झाले होते. तेव्हा राखीच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या होत्या. त्यामुळे राखी सावंतचं नावं पुष्कळ प्रमाणात चर्चेत आलं होतं. मध्येच अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या की आदिलनं राखीशी लग्न केलं नसून आदिललं लग्नाला नकार दिला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु नंतर  तिच्या बॉयफ्रेंडनं म्हणजे(Rakhi Sawant Boyfriend) आदिल खान दुरानीनं आपला गुन्हा कबूल केल्याचे समोर आले आहे. परंतु आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या आदिलला राखीशीच लग्न करा करायचे आहे असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडतो आहे. (why adil khan durranni wants to marry rakhi sawant here is the reason) 

राखी आणि लग्न. हा विषय अनेकदा मीडियामध्ये चघळला गेला आहे. आत्तापर्यंत राखीची अनेक लग्न चर्चेत होती. यापुर्वीनं तिनं स्वत:च्या लग्नाचा एक अख्खा शो ठेवला होता. ज्यात तिच्यासाठी वरांची लाईन लागली होती. हा शोसुद्धा वादात अडकला होता परंतु या शोला प्रेक्षकपसंतीही खूप मिळाली होती. तेव्हा राखीनं (Rakhi Sawant) आपल्या जीवनातील अनेक घडामोडींचे खुलासे केले होते.  त्यावेळीही या शोमधून आलेल्या मुलांनाही असा प्रश्न विचारला गेला होता की त्यांना राखीची लग्न का करायचा आहे. राखी ही अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायमच ओळखली जाते. 

राखीचं वय 44 असून आदिल हा 27 वर्षांचा आहे. तेव्हा आपल्या पेक्षा 17 वर्षे मोठ्या असणाऱ्या राखीला आपला जीवनसाथीदार आदिलनं निवडला आहे. राखी सावंतचे आयुष्य कायमच वादग्रस्त राहिले आहे. तिच्या आयुष्यात अनेक अशा गोष्टी झाल्या आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. राखीच्या आयुष्यातही अनेक वादळं येऊन गेली आहेत परंतु वेळ जातो तश्या गोष्टी या बदलतात. तेव्हा सध्या राखीच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहेत. राखी आता फायनली विवाहित (Rakhi Sawant Married) आहे. 

हेही वाचा - Dumper Trunk: डंपरने सकाळी सकाळी झोप उडवली, सरळ चहाच्या टिपरीत घुसला आणि...

राखीचं नावंही फातिमा झालं असल्याचे तिनं सांगितले. आता आपल्या जीवनसाथीसोबत ती कायम एकत्र राहणार आहे. आदिलनं राखीशी लग्न का केलं या प्रश्नाचे उत्तर काहीसे असे समोर येते आहे. राखी ही बॉलिवूड अभिनेत्री असून ती एक आयटम दिवा आहे. तिची प्रसिद्धी ही अमाप आहे. त्यामुळे आपल्या चांगल्या भवितव्यासाठी आणि पैशांसाठी राखीनं लग्न केलं असल्याचे समोर आले आहे.