Alia - Raha नाही तर Wallpaper वर Ranbir kapoor नं ठेवलाय 'या' खास व्यक्तीचा फोटो

Ranbir Kapoor Wallpaper: रणबीर कपूर आपल्या गोड स्माईलनं कायमच तरूणींना घायाळ करत असतो. त्यामुळे त्याच्या फॅन्सना कायम त्याच्या पर्सनल लाईफविषयी उत्सुकता लागून राहिलेली असते. तुम्हाला हे माहितीये का की त्याच्या मोबाईल वॉलपेपरवर नक्की कोणाचा फोटो आहे. 

Updated: Jan 8, 2023, 05:00 PM IST
 Alia - Raha नाही तर Wallpaper वर Ranbir kapoor नं ठेवलाय 'या' खास व्यक्तीचा फोटो  title=

Ranbir Kapoor Wallpaper: गेल्या महिन्याभरापासून चर्चा आहे ती रणबीर कपूर आणि आलिया भट्टची (Ranbir Kapoor and Alia Bhatt). त्याच्या लव्ह रिलेशनशिपपर्यंत ते त्यांच्या लग्नापर्यंत अनेक गोष्टींच्या चर्चा होत होत्या. त्यांच्या लग्नानंतर त्यांचे नवे घरं, आणि नंतर त्यांच्या तान्ह्या राहाची (Raha Kapoor) चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षात आपल्या चित्रपटांपेक्षा रणबीर आणि आलिया भट्ट यांच्या पर्सनल आयुष्याची जास्त चर्चा होती. आता पुन्हा एकदा रणबीर कपूरच्या त्या एका खास गुपिताचीच सर्वत्र चर्चा आहे. रणबीर कपूर आपल्या फोनवर नक्की कोणाचा फोटो लावला आहे. याचीच सगळीकडे चर्चा आहे. तुम्हाला वाटलं असेल की कदाचित त्याच्या वॉलपेपरवरती राहाचा नाहीतर आलियाचा फोटो असेल पण नाही... तर त्याच्या मोबाईल फोनवर कुणाचा वॉलपेपर (Wallpaper) या खास व्यक्तीचा फोटो आहे. (whos photo is there on ranbir kapoors moblie know more about that special person)

रणबीर कपूरच्या आयुष्यातलं गेलं वर्ष हे खूपच खास होतं. संजू या चित्रपटानंतर त्यानं चार वर्षांनी ब्रह्मास्त्र (Barhamshtra) या चित्रपटातून कमबॅक केला होता. गेल्याच्या गेल्या वर्षी आपल्या आयुष्यातून आपले सख्खे वडील गमावल्यानंतर आलियाच्या आणि त्याच्या लग्नानं त्याच्या आयुष्याची एक वेगळी सुरूवात झाली. त्यांच्या आयुष्यात त्याच्या मुलीचं राहाचं आगमन झालं. एकेकाळी प्रियकर-प्रेयसी असणारे रणबीर आलिया पती-पत्नी झाल्यानंतर आईवडील झाले. 

मध्यंतरी तो एका कार्यक्रमानंतर स्पॉट झाला होता. त्यावेळी त्याच्या वॉलपेपरवरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. तेव्हापासून त्याच्या वॉलपेपरचीच चर्चा आहे. रणबीर कपूर एका मुलाखतीतसाठी टी-सीरिजच्या (T-series) ऑफिसमध्ये गेला असताना त्याच्या वॉलपेपरचा फोटो सगळीकडे व्हायरल (viral) झाला होता. या वॉलपेपरवर ज्या व्यक्तीचा फोटो आहे ते जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. रणबीरच्या वॉलपेपरवर त्याच्या वडिलांचा म्हणजेच ऋषी कपूर यांचा फोटो लावला आहे. त्यांचा हातात ग्लास घेतला फोटो रणबीरनं आपल्या वॉलपेपरवर लावला आहे. 

हेही वाचा - Pune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...

रणबीरच्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तिचा जन्म झाल्यापासून रणबीर आणि आलियाचे चाहते राहाचा फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तेव्हा त्याच्या चाहत्यांसाठीही लवकरच तिचा फोटो पाहायला मिळेल अशी आशा आहे. त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता होती की आता रणबीरच्या वॉलपेपर कदाचित राहाचा फोटो पाहायला मिळेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणबीरचं त्याच्या वडिलांसोबतच रिलेशन हे खूपच खास होतं. त्यामुळे आपल्या वडिलांचा फोटो रणबीरच्या वॉलपेपरवर पाहून त्याचे चाहतेही हळवे (emotional) झाले आहेत.