मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. या दोघांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर दोघंही आपापल्या कामाला लागले आहेत. लवकरच आलिया आणि रणबीर पालक होणार आहेत. पण आलियाच्या प्रेग्नंसीच्या बातमीआधी लोकं तिला विचारत होते की, दोघंही हनिमूनला गेले नाहीत का? या प्रश्नाचं उत्तर फक्त आलिया आणि रणबीरच देऊ शकतात. मात्र याच दरम्यान आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आलिया तिच्या मावशीसोबत हनिमूनबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ जाहिरातीचं शूट आहे की, चित्रपटाची क्लिप आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. व्हिडिओमध्ये मावशी आलियाला विचारते की, ती तिच्या हनीमूनला कोणते कपडे घालणार आहे. पण यावर आलिया गमतीशिर पद्धतीने म्हणते की, आंटी जी हनीमूनला कपडे कोण घालतं, त्यानंतर तिथे बसलेले सर्व लोक हसायला लागतात.
रणबीर-आलियाचं लग्न पंजाबी रितीरिवाजानुसार पार पडलं. तिच्या लग्नात आलियाने सब्यसाचीने डिझाइन केलेली पांढरी साडी नेसली होती. याशिवाय तिने सोन्याचे दागिनेही घातले होते. याआधीही आलिया-रणबीरच्या लग्नाचे अनेक फोटो समोर आले आहेत. लवकरच आलिया आई होणार आहे. त्यामुळे जेवढी उत्सुकता कपूर आणि भट्ट परिवाराला आहे तेवढीच उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्येही पहायला मिळत आहे.