लोकप्रिय अभिनेता एम एम फारुखी आणि लिलिपुट सध्या आपल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या एवढ्या मोठ्या करिअरमधील महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. तसेच आपला अभिनय क्षेत्रातील प्रवास कसा सुरु झाला तिथपासून ते आपल्या उंचीमुळे अनेक कटू शब्दांना कसं सामोरं जावं लागलं, हा अनुभव शेअर केला आहे. तसेच यावेळी लिलिपुट यांनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि नवोदित कलाकारांना लाँच करणारा दिग्दर्शक करण जोहर याच्याबद्दल मोठी टिपणी केली आहे.
लिलपुट यांनी यावेळी दिग्दर्शक करण जोहर आपल्या संपर्कात नसल्याच सांगितलं. एवढंच नव्हे तर त्यांनी करण जोहरशी संपर्क करण्याचा प्रयत्न देखील केला पण काही जमलं नाही, असं देखील सांगितलं.
लिलिपुट यांनी लंलनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, करण जोहरशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते कधीच झालं नाही. लिलिपुट दूरदर्शनवर 'इंद्रधनुष' ही मालिका करत होते. या मालिकेत करण जोहरने बालकलाकार म्हणून डेब्यू केला होता. त्यावेळी करण जोहरचे हावभाव लिलिपुट यांना काही पटले नाहीत. करण जोहरच वागणं थोडं मुलींसारख होतं. ते लिलिपुट यांना काही पटलं नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी करणला याबाबत टोकलं देखील. या गोष्टीमुळे करण जोहर दुखावला गेला आणि आजपर्यंत तो लिलिपुट यांच्या संपर्कात नसल्याचं ते सांगतात.
एवढंच नव्हे तर लिलिपुट यांनी दोन चार वेळा करण जोहरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण ते काही होऊ शकले नाही. करण जोहरने आपल्या पुस्तकात देखील या प्रसंगाचा उल्लेख केला आहे.
लिलिपुट यांनी शाहरुख खानचा सिनेमा 'चमत्कार' मध्ये डायलॉग्स लिहिले होते. पण अद्याप या दोघांची भेट झालेली नाही. एका कलाकारासाठी सिनेमा लिहावा आणि त्याच्याशी अद्याप गाठभेटही होऊ नये ही गोष्ट थोडी विचित्र वाटणारी आहे. यामागचं कारण विचारण्यात आलं तेव्हा राजीव मेहरा कधीच सिनेमाच्या सेटवर रायटर्सला बोलवत नसतं. लेखक जे द्यायचा ते फायनल असायचे. डायलॉगमध्ये काही बदल करायचा असेल तर ते शुटिंगच्या आधी करावे नंतर परवानगी नव्हती. 'चमत्कार' हा सिनेमा 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. याच दिग्दर्शन राजीव मेहरा यांनी केली आहे. या सिनेमात उर्मिला मातोंडकर आणि नसिरुद्दीन शाह देखील होते.