अर्शद वारसीच्या मुलीला पाहिलंत का? सुहाना खानलाही देतेय टक्कर

Zene Zoe Warsi: अनेकदा स्टारकीड्सची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे अर्शद वारसीच्या मुलीची. असे अनेक स्टारकीड्स आहेत जे अत्यंत लो प्रोफाईल राहतात. परंतु त्यांच्या युनिकनेसमुळे त्यांची चर्चा होते. अर्शद वारसीची मुलगी झेने झो वारसी सुहाना खानलाही टक्कर देते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 8, 2023, 01:29 PM IST
अर्शद वारसीच्या मुलीला पाहिलंत का? सुहाना खानलाही देतेय टक्कर title=
June 8, 2023 | Who is zene zoe warsi daughter of arshad warsi read the full article to know about her (Photo: Zee News)

Zene Zoe Warsi: बॉलिवूडच्या स्टारकीड्सची कायमच चर्चा होताना दिसते. त्यांच्या अभिनयाची जितकी चर्चा होते तितकीच जास्त चर्चा ही त्यांच्या मुलांचीही चर्चा होते. स्टार कीड्सची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या कोण मागे मागे करताना दिसतात. त्यामुळे स्टारकीड्सचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अक्षय कुमार, शाहरूख खान, कजोल, आलिया भट्ट, करीना कपूर यांच्या मुलांची पापराझींमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. परंतु असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या मुलांची फारशी चर्चा होताना दिसत नाही. परंतु त्यांची मुलंही कोणापेक्षा कमी नाही. 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातील सर्किटची भुमिका केलेला अभिनेता अर्शद वारसीची सध्या चर्चा आहे. त्याची 'असूर 2' ही वेबमालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

सध्या या वेबसिरिजची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. परंतु अर्शद वारसीच्या लेकीला तुम्ही कधी पाहिले आहे का? अर्शदला एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यांची दोन्ही मुलं आता मोठी झाली आहेत. त्यामुळे सध्या ते चांगलेच लाईमलाईटमध्ये आले आहेत. बॉलिवूडचे काही स्टार कीड्स हे फार लो प्रोफाईल राहतात त्यातून अनेक स्टारकीड्स मात्र सतत चर्चेत असतात. कधी ते पार्टीमध्ये स्पॉट होतात तर ते मित्रांसोबत पबमध्येही जातात. परंतु सध्या चर्चा आहे ती म्हणजे याच लो प्रोफाईल स्टारकीड्सची. त्यातीलच एक आहे अर्शद वारसीच्या लेकीची. तिच्या नावापासून तिचं सगळंच युनिक आहे. त्यामुळे तिचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते. तेव्हा तिच्याबद्दल जाणून या लेखातून जाणून घेऊया. 

हेही वाचा - चर्चा तर होणारच; 21 साव्या वर्षी अभिनेत्रीनं घेतलं आलिशान घर, तुम्ही काय करताय?

अर्शद वारसीची मुलगी झेने झो वारसी ही अत्यंत खाजगी आयुष्य फॉलो करते. त्यामुळे तीही फारशी चर्चा होताना दिसत नाही. परंतु अर्शद वारसी यांची पत्नी मारिया गोरेटो ही कायमच चर्चेत असते. ती इन्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे. ती आपले आणि आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे अर्शद वारसीच्या लेकीची खूप चर्चा होताना दिसते. अर्शद वारसीनं आपल्या मुलीचे आगळेवेगळे नाव ठेवले आहे. आफ्रिकन भाषेत तिच्या नावाचा अर्थ आहे, खूपच सुंदर असा. तिच्या या युनिक नावाचीही फार चर्चा होताना दिसते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांची नावं अत्यंत वेगळी ठेवली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्शद यांच्या मुलीची फॅशनही गाजते. तिचे हटके फॅशनमधील लुक पाहून तिची प्रचंड स्तुती होताना दिसते. त्यामुळे सुहाना खानही झेने झो वारसी टक्कर देताना दिसते.