विक्रांत मैस्सीचा खरा आनंद जिच्यात आहे, त्या शीतलसाठी सोपा नव्हता अभिनयाचा प्रवास

शीतल ही मॉडेल असल्याने ती हॉट लूकमधील फोटो देखील पोस्ट करताना दिसते.

Updated: Feb 20, 2022, 01:04 PM IST
  विक्रांत मैस्सीचा खरा आनंद जिच्यात आहे, त्या शीतलसाठी सोपा नव्हता अभिनयाचा प्रवास title=

मुंबई : टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवत आपलं करिअर सुर करणारा अभिनेता विक्रांत मैस्सी हा आज घराघरात पोहोचला आहे. त्याचा दमदार अभिनय आणि भूमिका यामुळे त्याने तरुणाईला वेड लावले आहे.

सध्या तो लग्नसोहळ्यामुळे खूपच चर्चेत आहे. विक्रांतने 14 फेब्रुवारी रोजी गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत लग्नगाठ बांधली आहे. 

विक्रांत जिच्यावर जीवापाड प्रेमात करतो ती शीतल ठाकूर नक्की कोण आहे? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अनेकांना पडला आहे.  या जोडीने अगदी साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. यावेळी त्यांचे नातेवाईक आणि जवळचे लोक उपस्थित होते. 
लग्नानंतर शीतल खूपच चर्चेत आली आहे. 

शीतल हिचा जन्म 13 नोव्हेंबर 1991 मध्ये हिमाचल प्रदेशच्या एका धरमशाला येथे झाला आहे.  ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.तिच्या कुटुंबात आई-वडील, आजी, भाऊ आणि मोठी बहिण आहेत

शीतलने तिचं सुरुवातीचं शिक्षण चंदीगढमध्ये केलं आहे. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच कॉलेजमध्ये शीतलने ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला. 

त्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. शिक्षण पुर्ण झाल्यावर तिने इंजिनियअरचा जॉब केला. त्यासोबतच तिने मॉडेलिंग प्रोजेक्ट देखील साईन केले.

अपने परिवार के साथ शीतल ठाकुर

2012 मध्ये तिने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने जाहिरातींमध्ये ही काम केलं. तिला काहीतरी मोठं करायचं होती. मग तिने फिल्म आणि टीव्ही सीरीअलमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न केला. तिने पंजाबी सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण केलं. 

शीतल ठाकुर

शीतल ही मॉडेल असल्याने ती हॉट लूकमधील फोटो देखील पोस्ट करताना दिसते.