कोण आहे श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड? पहिल्यांदाच दिसले एकत्र

Who is Shraddha Kapoor's Boyfriend Rahul Mody : श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड नक्की करतोय काय तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया.

दिक्षा पाटील | Updated: Mar 3, 2024, 10:33 AM IST
कोण आहे श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड? पहिल्यांदाच दिसले एकत्र title=
(Photo Credit : Social Media)

Who is Shraddha Kapoor's Boyfriend Rahul Mody : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज 3 मार्च रोजी वाढदिवस आहे. श्रद्धा तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान, नुकतीच सगळीकडे चर्चा रंगली आहे की श्रद्धा कपूर ही रिलेशनशिप आहे. त्याचं कारण म्हणजे श्रद्धा कपूर जेव्हा जामनगरमध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत दिसली होती. ते दोघं सोबत होते तेव्हा राहुल मोदी हा प्रोटेक्टिव्ह होत असल्याचे दिसले. दोघांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला तर जाणून घेऊया की कोण आहे राहुल मोदी? 

श्रद्धा कपूरनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे आणि ती सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की तिनं खरंच तिचं नात ऑफिशिअल केलं आहे? दरम्यान, याआधी श्रद्धा ही लोकप्रिय फोटोग्राफर रोहन श्रेष्ठला डेट करत होती असं म्हटलं जातं होतं. ते दोघं अनेकदा एकत्र स्पॉट व्हाययचे, पण काही काळानंतर त्या सगळ्यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर आता श्रद्धाला राहुल मोदीसोबत स्पॉट केल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे राहुल मोदी? 

तुम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायचं आहे की राहुल मोदी कोण आहे? श्रद्धा कपूरचा हा कथित बॉयफ्रेंड हा एक लेखक आणि असिस्टंट डायरेक्टर आहे. ही चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा श्रद्धानं 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात काम केलं. त्याचं कारण म्हणजे राहुल हा लव रंजनच्या या चित्रपटासाठी लेखक म्हणून काम करत होता. श्रद्धा कपूरचे चाहते तिला राहुलसोबत पाहून इतके आनंदी नाहीत असं म्हटलं जातं आहे. कारण त्यावर कोणत्याची चर्चा सुरु झालेल्या नाहीत. मात्र, श्रद्धाच्या पुरुष चाहत्यांना नक्कीच वाईट वाटलं असणार. 

हेही वाचा : त्नीच्या निधनानंतर अभिनयापासून दूर गेलेला भूषण कडू सध्या काय करतोय?

राहुलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं एमटीव्हीच्या 'पर्सनल अत्याचार - सीजन 1' मध्ये एक स्पर्धक म्हणून हजेरी लावली होती. त्यानंतर तो 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' आणि 'लाइफ विदाउट वाइफ' या चित्रपटांमध्ये दिसला. छोट्या पडद्याशिवाय, राहुल मोदी 'प्यार का पंचनामा 2' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटाचा भाग होता. रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा आणि राहुल हे दोघं 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान, जवळ आल्याचे म्हटले जाते.