सासूलाच करीनाचा मोठा प्रश्न; मिळालेल्या उत्तरानं उंचावतील भुवया

करीनाने सासूला विचारलं सून आणि लेकीतील अंतर, उत्तरानं तुमच्याही उंचावतील भुवया  

Updated: Oct 22, 2021, 10:45 AM IST
सासूलाच करीनाचा मोठा प्रश्न; मिळालेल्या उत्तरानं उंचावतील भुवया   title=

मुंबई : दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर आणि अभिनेत्री करीना कपूर खानला रॉयल सासू-सून म्हणायला काही हरकत नाही. दोघी एकमेकींवर प्रचंड प्रेम करतात आणि ही गोष्ट करानाने अनेकदा मुलाखतींमध्ये मान्य केली आहे. असं ही अनेक वेळा झालं आहे की शर्मिला, करीनाचं कौतुक करताना थकल्या नाहीत. करीना सध्याच्या घडीची एक प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेचं, पण ती रेडीओ शो 'व्हाट वूमॅन वॉंट' देखील होस्ट करते. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

एकदा करीनाच्या शोमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली, तेव्हा करनाने सासूला मुलगी आणि सूनेमधील अंतर विचारं.  तेव्हा तिच्या सासू म्हणजे शर्मिला यांनी जबरदस्त उत्तर दिलं. शर्मिला उत्तर देत म्हणाल्या, 'मुलगी आपल्या डोळ्यांसमोर मोठी होते. तुम्ही तिचा स्वभाव उत्तम प्रकारे समजू शकता. तुम्हाला कल्पना असते ती कोणत्या गोष्टीवर नाराज होईल आणि कोणत्या गोष्टीवर आनंदी. एवढंच नाही तर तिच्या रागाला कशाप्रकारे आपण शांत करू शकतो हे देखील आपल्याला माहिती असतं...'

पुढे सूनेबद्दल बोलताना शर्मिला म्हणाल्या, 'जेव्हा सूनाला आपण भेटतो तेव्हा ती समजदार असते. तुम्हाला तिच्या स्वभावाबद्दल काही माहिती नसतं. तिच्यासोबत जुळवून घेण्यासाठी काही काळ लागतो. जेव्हा एक मुलगी सून म्हणून घरात येते तेव्हा तिचं चांगल्याप्रकारे स्वागत करायला हवं आणि तिला सहज वाटून द्यायला हवं...'

शर्मिला टागोर मंसूर अली खानच्या पत्नी आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सैफ अली खान, सबा अली खान आणि सोहा अली खान अशी त्यांची नावे आहेत. सैफ त्याची दुसरी पत्नी करीना कपूर खानसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर  सोहा अभिनेता कुणाल खेमूसोबत वैवाहिक आयुष्य जगत आहे. सबा एक ज्वेलरी डिझायनर आहे.