संजय लीला भन्साळी यांची बहुचर्चित सीरिज हीरामंडीमुळे त्यातील प्रत्येक कलाकार चर्चेत आहेत. आज अनेक वर्षांनंतर शेखर सुमन हा देखील या सीरिजमध्ये झळकणार आहे. त्यामुळे या सीरिजनिमित्त एका मुलाखतीत त्याने जागवल्या 'उत्सव' चित्रपटातील शूटिंगच्या आठवणी जागवल्या.
पाटणा सोडून मुंबई आल्यावर अवघ्या दोन आठवड्यात शेखर यांना उत्सव या चित्रपटाची ऑफर आली. 'मुंबईत येऊन सुटकेसही उघडली नाही आणि मला ब्रेक मिळाला आणि तोही रेखासारखा अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी. शशी कपूर, गिरीश कर्नाड, रेखा कायम ऋणी राहीन'
उत्सव चित्रपटाच शुटिंग सुरु होतं, तेव्हा रेखाच्या घरी आयकर विभागाचे छापे पडले होते. याबद्दल बोलताना शेखर म्हणाला की, 'मी रेखासारखा व्यावसायिक कलाकार पाहिला नाही. शूटिंगच्या पहिल्या दिवशीच तिच्या घरावर आयकर विभागाची मोठी धाड पडली होती. हे कळल्यावर दुसऱ्या कुठल्याही कलाकार असता तो बॅग भरुन निघून गेला असता. पण रेखा म्हणाली मी माझं काम करणार.'
या चित्रपटातील रेखा आणि शेखरमधील इंटिमेट सीन्सवरुन अनेक गदारोळ झाला होता. आजही त्या बोल्ड सीनबद्दल बोलताना शेखर सुमन म्हणाला की, 'रेखा कधीही नखरे दाखवायच्या नाहीत. इंटिमेट सीन शूट करतानाही रेखा सेटवर कधीही अस्वस्थ किंवा नाराज दिसली नाही. इतर अभिनेत्रींप्रमाणेच त्यांनी नखरे न करता मला त्या इंटिमेट सीनच्या वेळी स्वत:ला स्पर्श करण्यापासून कधीही रोखलं नाही. रेखा त्या खूप प्रोफेशनल आहेत.'
उत्सव या चित्रपटानंतर मला वाटलं आता माझं करिअर वेगाने पुढे जाईल. त्यानंतर मी बरेच चित्रपट अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केलं. पण एका पॉइंटनंतर चांगल्या भूमिका मिळणं मला बंद झालं. दरम्यान हिरामंडी ही सीरिज 1 मे 2024 ला नेटफिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यात अनेक कलाकार अनेक वर्षांनंतर झळकणार आहेत.