नसिरूद्दीन शाह आणि पंकज कपूर यांच्याहूनही महान अभिनेत्री होत्या त्यांच्या सासूबाई

पांढऱ्या रंगाची साडी आणि सततच्या 'आई'च्या भूमिका 

Updated: Mar 5, 2022, 09:41 AM IST
नसिरूद्दीन शाह आणि पंकज कपूर यांच्याहूनही महान अभिनेत्री होत्या त्यांच्या सासूबाई   title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हिंदी कलाविश्वात आतापर्यंत बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांना भारावून सोडलं आहे. काही पट्टीच्या अभिनेत्यांनी, कलाकारांनी प्रेक्षकांना मन तृप्त करणारा अनुभवही घेऊ दिला. अशाच कलाकारांममध्ये ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह आणि पंकज कपूर यांचीही नावं येतात. 

पण, तुम्हाला माहितीये का या दोन्ही कलाकारांपेक्षाही त्यांच्या सासूबाई, अर्थात रत्ना पाठक आणि सुप्रिया पाठक यांच्या आई, दिना पाठक या एक दमदार आणि तितक्याच प्रभावी अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये सक्रिय होत्या. 

पांढऱ्या रंगाची साडी आणि सततच्या 'आई'च्या भूमिका साकारूनही दिना पाठक यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली होती. 70, 80 च्या दशकात दिना पाठक यांनी साकारलेल्या कलाकृती कायम स्मरणात रहाव्या अशाच. 

दिना पाठक यांनी कलाजगतामध्ये तेव्हा पाऊल ठेवलं होतं, ज्यावेळी महिलांनी अशी कामं करणं वाईट मानलं जात होतं. पण, कशाचीही तमा न बाळगता दिना पाठक गुजराती व्यासपीठ गाजवू लागल्या. 

आपल्या आईने जवळपास 30 ते 40 वर्षे एकाच रंगाच्या साडीमध्ये एकसारख्याच भूमिका साकारल्या याची खंत त्यांची मुलगी सुप्रिया पाठक आजही व्यक्त करतात. 

आज खरंच आई हवी होती..., असंच नकळत त्यांच्या तोंडून निघतं. किंबहुना जिथं एकसारखं काम करुन आपण थकतो, तिथं आपल्या आईनं इतकी वर्षे याच धाटणीच्या भूमिका साकारलेलं पाहून, तिच्या मनात असणारं वादळ मी जाणू शकते, अशी सहानुभूतीची भावनाही त्यांनी व्यक्त केली.