मीना कुमारी यांच्या निधनानंतर 'आता कधी येऊ नकोस' असं का म्हणाल्या होत्या नर्गिस?

बॉलिवूडच्या ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांनी चित्रपटसृष्टीवर अनेक वर्षे राज्य केलं.

Updated: Jan 18, 2022, 09:17 PM IST
मीना कुमारी यांच्या निधनानंतर 'आता कधी येऊ नकोस' असं का म्हणाल्या होत्या नर्गिस? title=

मुंबई : बॉलिवूडच्या ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांनी चित्रपटसृष्टीवर अनेक वर्षे राज्य केलं. त्यांच्या सौंदर्याने आणि शैलीने लाखो लोकांना भुरळ घातली होती. मीना कुमारी यांनी आपल्या स्टाईलने लोकांची मने जिंकली होती. 'किड्स का खेल' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्याचवेळी 1972 मध्ये मीना कुमारी यांचं निधन झालं.

त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. मात्र अभिनेत्री नर्गिस यांनी  'आता या जगात परत येऊ नकोस' असं लिहिलं होतं. खरंतर, मीना कुमारी यांच्या निधनानंतर नर्गिस यांनी त्यांच्यासाठी एक लेख लिहिला जो उर्दू मासिकातही प्रकाशित झाला होता. मीना-कुमारी आणि नर्गिस जवळच्या मैत्रिणी होत्या. 'मैं चुप रहूंगी' चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती.

इतकंच नाही तर मीना कुमारी नर्गिस यांना बाजी म्हणायच्या. मीना कुमारी यांच्या निधनावर नर्गिस यांनी एका लेखात लिहिलं आहे की, 'मी याआधी असं कधीच बोलले नव्हते, पण आज तुझं अभिनंदन करत आहे आणि तू या जगात पुन्हा कधीही येऊ नकोस असं सांगत आहे. हे जग तुमच्यासारख्या लोकांच्या लायकीचं नाही.

मीना कुमारीबद्दल नर्गिस पुढे म्हणाली, 'मीनाला एका रात्री बागेत धाप लागताना पाहिलं होतं. यावंर मी मीना यांना म्हणाले, तू आराम का करत नाहीस.  यावंर त्या म्हणाल्या, माझ्या नशिबात आराम नाही. मी फक्त एकदाच विश्रांती घेईन. त्या रात्री तिच्या खोलीतून हिंसेचे आवाजही येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे डोळे सुजलेले मी पाहिले.

नर्गिस यांनी पुढे लिहिलं की, काही वेळाने मला कळलं की तिने कमाल साहबचं घर सोडलं आहे. तिचं सचिव बकरसोबत खूप भांडण झालं आणि नंतर ती परत गेलीच नाही. दारूमुळे तिचं फुफ्फुस खराब झालं होते. जेव्हा मी तिला नर्सिंग होममध्ये भेटायला गेले तेव्हा मीना म्हणाल्या, 'लढाई ही माझ्याही सहनशक्तीची मर्यादा आहे. कमालसाहेबांच्या सचिवने माझ्यावर हात कसा उचलला? याबाबत मी तक्रार केली असता त्यांनी काहीच केलं नाही. तेव्हाच मी विचार केला की आता मी तिकडे परत जाणार नाही.