मुंबई : बॉलिवूड गायक-अभिनेता हिमेश रेशमियाचं वैयक्तिक आयुष्य एकेकाळी खूप चर्चेत होतं. त्याने एक्स पत्नी कोमलसोबत 22 वर्षांचं नातं संपवलं आणि आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं. हिमेश आणि त्याची दुसरी पत्नी सोनिया कपूर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. या खास प्रसंगी जाणून घेऊया हिमेश आणि कोमलचं लग्न का तुटलं? आणि त्याचं दुसरं लग्न कसं झालं.
हिमेश रेशमिया आणि कोमलचं लग्न 1995 मध्ये झालं होतं. लग्नाच्या 22 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. हिमेशची सोनिया कपूरशी जवळीक वाढल्याने कोमल आणि हिमेशचं नातं तुटल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण कोमलने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता.
कोमल म्हणाली, 'हिमेश आणि मी एकमेकांचा खूप आदर करतो आणि आम्ही एकत्रितपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आपण नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे... कारण मी त्याच्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि नेहमीच राहीन. आणि माझ्या कुटुंबाप्रती त्याचीही तीच भावना आहे. आमच्या वैवाहिक जीवनात कंपॅटिबिलिटी इशूज आहेत. पण आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर आहे.
या प्रकरणात इतर कोणालाही आणू नये आणि त्याला कोणीही जबाबदार नाही. याला सोनिया जबाबदार नाही आणि आमचा मुलगा आणि कुटुंबीय सोनियावर कुटुंबातील सदस्यासारखे खूप प्रेम करतात.
हिमेशने स्वतः असंही म्हटलं होतं की, 'आम्ही पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्हाला किंवा आमच्या कुटुंबीयांना या निर्णयावर कोणताही आक्षेप नाही. कोमल आज आणि नेहमी आमच्या कुटुंबाचा एक भाग असेल आणि मी तिच्या कुटुंबाचा भाग असेल. हिमेश ज्या इमारतीत राहतो त्याच बिल्डिंगमध्ये कोमल राहणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या.
कोमलने हिमेशसोबतच्या घटस्फोटात स्पष्ट केलं आहे की, या सगळ्याला सोनिया जबाबदार नाही. पण सोनियासोबत हिमेशची जवळीक कधी आणि कशी वाढली ते जाणून घेऊया. सोनिया आणि हिमेश 2006 पासून डेट करू लागले.
यानंतर सोनिया हिमेशच्या घरी जात राहिली. घटस्फोटाआधी दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्यास सुरुवात केली होती. अशा बातम्या आल्या होत्या की, हिमेशने सोनियांचे सगळे खर्च उचलण्यास सुरुवात केली होती आणि तिच्यासोबत व्हेकेशन्सला देखील जायचा. मात्र, नंतर हिमेशने या गोष्टींना स्पष्टपणे नकार दिला.
हिमेशने आपले सोनियासोबतचे नाते उघडपणं उघड केलं नसेल, पण 2016 मध्ये जेव्हा त्याने कोमलसोबत घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हा हे रहस्य जगासमोर आलं. आणि 2018 मध्ये या दोघांनी कायमचा एकमेकांचा हात धरला.