जेव्हा दीपिका तिच्या शैलीत म्हणते 'अपना टाईम आयेगा'

'गली बॉय' चित्रपटातील 'अपना टाईम आयेगा' गाण्याला चाहत्यांनी चांगलचं डोक्यावर घेतले होतं.  

Updated: Feb 15, 2020, 09:13 AM IST
जेव्हा दीपिका तिच्या शैलीत म्हणते 'अपना टाईम आयेगा' title=

मुंबई : दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' चित्रपट गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. एक सामान्य घरातील मुलगा आपल्या चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर कशाप्रकारे यश संपादन करतो याचं उत्तम उदाहरण या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न अख्तर यांनी केला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली होती.

चित्रपटातील 'अपना टाईम आयेगा' या गाण्याला तर चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर आता या सुपरहीट चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. हेच औचित्य साधत अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या शैलीत 'अपना टाईम आयेगा' हे गाणं सादर केलं आहे. सोशल मीडियावर हे गाणं मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Ohh I think I found myself a cheerleaderapnatimeaayega #throwback @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

दीपिका हा हटके अंदाजातील व्हिडिओ अभिनेता आणि पती रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला आहे. दीपिका आणि रणवीर लवकरच '८३' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये रणवीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. 

'८३' चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली साकारण्यात आलेल्या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत दिसणार आहे. ती कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. 

रणवीर आणि दीपिका शिवाय चित्रपटात साकिब सलीम, आदिनाथ कोठारे, चिराग पाटिल, हार्डी संधू, ऐमी विर्क, जतिन सरना, पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, दिनकर शर्मा, जीवा, साहिल खट्टर, धैर्य करवा, निशांत दहिया आणि आर बद्री देखील भूमिका साकारणार आहे.