'Munnabhai MBBS'च्या 'जादू की झप्पी' सीनमध्ये परिचारिकेची भुमिका निभावणाऱ्या मराठी अभिनेत्री कोण माहितीयेत का?

Munnabai MBBS Jadu Ki Jhappi Scene: 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस' (Sanjay Dutt Movie) हा चित्रपट फारच लोकप्रिय आहे. या चित्रपटातील जादू की झप्पी हा सीन तुम्हाला आठवतोय का? या सीनमध्ये स्मितहास्य देत प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या त्या मराठी अभिनेत्री कोण (Marathi Actress in Munnabhai MBBS) आहेत तुम्हाला माहितीये का? 

Updated: Mar 19, 2023, 05:51 PM IST
'Munnabhai MBBS'च्या 'जादू की झप्पी' सीनमध्ये परिचारिकेची भुमिका निभावणाऱ्या मराठी अभिनेत्री कोण माहितीयेत का? title=
Munnabhai MBBS jadu ki jhappi scene marathi actress madhavi soman as nurse who smiles in the scene entertainment news in marathi

Marathi Actress Madhavi Soman in Munnabai MBBS: मराठी कलाकार आता फक्त मराठी पुरतेच नाही तर हिंदी आणि परदेशी चित्रपटातूनही (Marathi Television Actresses) कामं करताना दिसत आहेत. मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकं अशा विविध माध्यमांतून काम करणारे लोकप्रिय आणि कर्तबगार मराठी अभिनेते, अभिनेत्री वेब सिरिजच्या (Marathi Web Series) माध्यमातूनही आता समोर येताना दिसत आहेत. सध्या मालिकाही लोकप्रिय होताना दिसत आहेत. परंतु असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी हिंदी चित्रपटातून छोट्या का होईना पण लक्ष वेधून घेणाऱ्या भुमिका केल्या आहेत. एखादा कलाकार लोकप्रिय झाला की त्याला आधी कुठल्या तरी सिनेमात अथवा मालिकेतून आपण पाहिलेले असते जे आपल्या नंतर आठवते. त्यातही एक गंमत आहे. तुम्हाला 'मुन्नाबाई एम.बी.बी.एस' (Munnabhai MBBS) हा चित्रपट आठवत असेलच. संजय दत्तच्या या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. 

या चित्रपटातही अशाच एका गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्रीनं काम केले होते. त्या मराठीतील नामवंत अभिनेत्री आहेत. त्यांचे नाव आहे माधवी सोमण. त्यांचे पतीदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहे. अभिनेते योगेश सोमण हे त्यांचे पती आहे. त्यांच्या 'दृश्यम', 'दृश्यम 2' (Actor Yogesh Soman in Drishyam Movie) या अजय देवगणच्या (Ajay Devgan) हिंदी चित्रपटातील भुमिकेसाठी प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले होते. माधवी सोमण यांनी अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमधून उत्कृष्ट भुमिका केल्या आहेत. 

मुन्नाभाईतला 'तो' सीन आठवतोय का? 

'मुन्नाभाई एम.बी.बी.एस' (Munnabhai MBBS Jadu Ki Jhappi Scence) या चित्रपटातील अनेक सीन गाजले आहेत. त्यातील अनेक संवादही लोकांच्या तोंडपाठ असतील. हा चित्रपट तेव्हा प्रचंड लोकप्रिय झाला होता. आजही या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. मुन्नाभाई एम.बी.बी.एस या चित्रपटात एक सीन आहे ज्यात संजय दत्त आणि एका वृद्ध सफाई कामगार यांच्यात थोडीशी बाताबाती होती. संजय दत्त हा शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेत असतो आणि मग त्यांना मिठी मरतो हा सीन जादू की झप्पी म्हणून लोकप्रिय आहे. या सीनच्या शेवटी एक परिचारिका त्यांच्याकडे पाहून स्मित करतात. त्या अभिनेत्री माधवी सोमण आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'या' आहेत गाजलेल्या मालिका

माधवी सोमण यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपटातून कामं केली आहेत. पिंपळपान, अवघाचि संसार, उंच माझा झोका, वादळवाट, घाडगे एन्ड सून, विठू माऊली, जय जय स्वामी समर्थ अशा काही मालिकांमधून तर ट्रिपल सीट, 15 ऑगस्ट, मिशन चॅम्पियन अशा काही लोकप्रिय मराठी चित्रपटातून कामं केली आहेत.