दिवाळी पार्टीतला एकता आणि राजकुमारचा डान्स व्हायरल

गोविंदाच्या गाण्यावर धरला ठेका 

Updated: Oct 29, 2019, 12:23 PM IST
दिवाळी पार्टीतला एकता आणि राजकुमारचा डान्स व्हायरल  title=

मुंबई : रविवारी बलिवूडकरांनी दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री सोनम कपूरने दिवाळीच्या निमित्ताने घरी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अनेक बॉलिवूड मंडळी उपस्थित होते. 

दिवाळीच्या या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये अभिनेता राजकुमार राव आणि निर्माती-दिग्दर्शक एकता कपूरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

एकता कपूरने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेता राजकुमार रावसोबत एकता गोविंदा आणि रवीना टंडनच्या सुपरहिट 'अंखियों से गोली मारे' या गाण्यावर डान्स करत आहे. राजकुमार राव एकतासोबत ठेका धरत आहे. या व्हिडिओला एकताने सुंदर कॅप्शन देखील लिहिलं आहे,'मी जास्त डान्स करत नाही, पण माझ्या साथीदाराने मला अपराध करण्यास मदत केली आहे.' 

दिवाळी पार्टीचं आयोजन सोनम कपूरच्या घरी करण्यात आलं होत. या पार्टीत सैफ अली खान, कार्तिक आर्यन, करिश्मा कपूर, विराट कोहली, अनुष्का शर्मा, जान्हवी कपूर, श्रद्धा कपूर, एकता, शाहिद कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमू, सारा अली खान आणि दिया मिर्झा सह अनेक बॉलिवूड सितारे उपस्थित होते.