बालपणापासूनच हृतिक अफलातून डान्सर

हे सिद्ध करणारा व्हिडिओ पाहाच   

Updated: Nov 18, 2019, 05:03 PM IST
बालपणापासूनच हृतिक अफलातून डान्सर title=
हृतिक रोशन

मुंबई : अभिनयासोबतच नृत्यकौशल्यानेही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता  Hrithik हृतिक रोशन यांच्या नृत्याविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. मुळात हृतिकने कायमच अभिनयाप्रमाणेच त्याच्या नृत्यकौशल्यावरही तितकाच भर दिला. परिणामी तो एक समृद्ध अभिनेता असण्यासोबच अफलातून डान्सर म्हणूनही या रुपेरी पडद्यावर नावारुपास आला. 

बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता आताच नव्हे, तर बालपणापासूनच नृत्याच्या बाबतीत सर्वांचं लक्ष वेधत होता. हेच सिद्ध करणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हृतिकची आई, पिंकी रोशन यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बालपणी तो कशा प्रकारे कशाचीही तमा न बाळगता आपल्याच धुंदीत थिरकायचा याची झलक पाहायला मिळत आहे. 

कोणा एका जुन्या समारंभाच्या वेळी चित्रीत करण्यात आलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लगेचच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. निळं टी- शर्ट आणि जीन्स असा त्याचा एकंदर लूक या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुळात व्हिडिओला कोणत्याही कॅप्शनची गरज नसल्यामुळे हृतिकच्या आईने #onecapturedmoments अशा हॅशटॅगसह तो पोस्ट केला.

 
 
 
 

A post shared by Pinkie Roshan (@pinkieroshan) on

हा व्हिडिओ पाहता बी- टाऊनचा ग्रीक गॉड नृत्याच्या बाबतीत भल्याभल्यांना नेमका मागे टाकतो तरी कसा, या प्रश्नाचं उत्तर मिळत आहे, असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, 'सुपर ३०' आणि 'वॉर' या चित्रपटांना चांगलं यश मिळाल्यानंतर आता हृतिक त्याच्या काही पुढच्या कामांवर लक्ष केंद्रीत करत आहे.